Friday, June 21, 2024
Homeजळगावभाजपा शिंदे गटाचा आ. खडसेंना धक्का

भाजपा शिंदे गटाचा आ. खडसेंना धक्का

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

- Advertisement -

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (District Cooperative Milk Producers Union) निवडणुकीत (election) राष्ट्रवादीचे माजी आ. दिलीप वाघ (NCP’s former MLA Dilip Wagh) हे आज भाजपा-शिंदे गट (BJP-Shinde group) प्रणित शेतकरी विकास पॅनलमध्ये (Farmer Development Panel) दाखल झाले. राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे (NCP leader MLA Eknathrao Khadse) यांच्यासाठी हा मोठा धक्का (Big shock) मानला जात आहे. दरम्यान पारंपारिक विरोधक (traditional opponents) असलेल्या दिलीप वाघांसाठी (Dileep Wagh) आ. किशोर पाटील (MLA Kishore Patil) यांनी माघार घेत एका दगडात अनेक पक्षी मारल्याची (killing many birds) चर्चा होत आहे.

जिल्हा दूध संघाच्या निवडणूकीत शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांची माघार आज सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली. आमदार किशोर पाटील आणि राष्ट्रवादीचे माजी आ. दिलीप वाघ यांच्यातून कधीकाळी विस्तवही जात नव्हता. पाचोरा विधानसभा निवडणुकीतही दोन वेळा या मतदारसंघातून किशोर पाटील यांनी दिलीप वाघ यांना पराभूत केले आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते पारंपारिक विरोधक मानले जातात.

मात्र बाजार समितीवर प्रशासक म्हणून दिलीप वाघ यांची नियुक्ती झाल्यापासून या दोघांमध्ये मनोमिलन झाल्याची चर्चा होती. तसेच गतवर्षी झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आ. किशोर पाटील यांच्यासाठी दिलीप वाघ यांनी माघार घेतली होती. त्यावेळी दूध संघात सहकार्य करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये शब्द दिला गेला होता.

किशोर पाटलांचे एका दगडात अनेक पक्षी

शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी जिल्हा बँकेवेळी दिलेला शब्द आज दूध संघाच्या निवडणुकीत पाळला. दूध संघाच्या निवडणुकीतून माघार घेत दिलीप वाघ यांना त्यांनी बिनविरोध केले. दरम्यान आमदार किशोर पाटील यांनी माघार घेत आमदारकीची वाट मोकळी करीत राजकीय शत्रुंनाही एकाच दगडात गारद केल्याची जोरदार चर्चा होत आहे.

मी पालकमंत्री अन् महाजनांसोबतच – माजी आ.दिलीप वाघ गेल्या काही दिवसांपासून आ. एकनाथराव खडसेंच्या बैठकांना हजेरी लावणारे दिलीप वाघ बिनविरोध झाल्यानंतर अचानकपणे भाजपा आणि शिंदे गटाच्या तंबूत दाखल झाले. यावेळी खडसे यांच्या पॅनलकडून वाघ हे आमचेच असल्याचा दावा करण्यात आला. तर भाजपा आणि शिंदे गटानेही वाघ हे आमच्यासोबत असल्याचे सांगितले. दरम्यान याबाबत माजी आ. दिलीप वाघ यांनी भूमिका स्पष्ट केली. वाघ म्हणाले की, सहकारात राजकारण नसते. त्यामुळे दूध संघासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि ना. गिरीश महाजन यांच्या सोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माजी आ. दिलीप वाघ

- Advertisment -

ताज्या बातम्या