Thursday, May 22, 2025
Homeनगरभाजप-सेनेच्या ‘सावरकर’पासून नगरमधील राष्ट्रवादी लांब

भाजप-सेनेच्या ‘सावरकर’पासून नगरमधील राष्ट्रवादी लांब

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जोडीला राष्ट्रवादीचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार आले असले तरी स्थानिक पातळीवर मात्र शिंदे व फडणवीस यांच्या समर्थकांनी उपमुख्यमंत्री पवार समर्थकांना दूर ठेवल्याचे पाहवायास मिळाले. नगरमध्ये आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरील नाटकादरम्यान स्थानिक भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना नियोजन ते नाटक पाहण्यासाठी साधले निमंत्रण दिले नाही. यामुळे हा विषय सध्या शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

नगर शहराच्या राजकारणात भाजप व शिवसेना यांचा विरोधक राष्ट्रवादी अशी ओळख आहे. त्यातल्या त्यात भाजप-राष्ट्रवादीचे स्थानिक स्तरावर जुळलेले आहे. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानेच भाजपचा पहिला महापौर नगरला झालेला आहे. मात्र, वर्षभरापूर्वी राज्याच्या राजकारणात पहिला भूकंप झाला व शिवसेनेतून 40 आमदार बाहेर पडून त्यांनी भाजपच्या पाठिंबावर राज्यात युतीचे सरकार आणले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जोडी स्थानिक नगर शहराच्या स्तरावर या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी एकमेकांच्या साथीने विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून लौकीकास्पद ठरवली. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी स्थानिक भाजपच्यादृष्टीने विरोधक झाला. त्यात आता शहरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरील सागरा प्राण तळमळला या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.

मुख्यमंत्री शिंदे समर्थक शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे व बाबूशेठ टायरवाले, संपर्क प्रमुख सचिन जाधव, शहर प्रमुख दिलीप सातपुते व नगरसेवक सुभाष लोंढे यांच्यासह स्थानिक भाजपमधील फडणवीस समर्थक माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी व शहर उपाध्यक्ष सचिन पारखी यांनी यासाठी पुढाकार घेतला. या नाटकाच्या जाहिरातीच्या फ्लेक्स बोर्डांवर भाजप व शिंदे सेनेच्या राज्यस्तरीय सर्व मान्यवर नेत्यांचे फोटो होते, मात्र, सरकारमध्ये सामील झालेले नवीन नेते अजित पवार यांचा फोटो नव्हता. त्यामुळे राज्यातील सत्ता विस्तार अजूनही स्थानिक शिवसेना-भाजपच्या समर्थकांनी अंगवळणी पडून घेतल्याचे दिसत नाही.

अर्थात स्थानिक नगरच्या राजकारणात भाजप- शिवसेना विरोधात राष्ट्रवादी असल्याने त्यांनाही जवळ घेणे नको व त्यांच्या नेत्यांचाही उदो उदो नको या भावनेतूनच हे फ्लेक्स नाट्य रंगल्याचे दिसते. मात्र, ते शहरात चर्चेचे झाले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Chhagan Bhujbal : “पालक कोण होईल त्याची काळजी करू नका, मी...

0
नाशिक | Nashik महायुतीला (Mahayuti) विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) २३७ जागांवर घवघवीत यश मिळाले होते. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेत आले होते. त्यानंतर...