Wednesday, April 2, 2025
Homeनगरभाजप प्रदेश सरचिटणीसावर वाळू चोरीचा गुन्हा दाखल

भाजप प्रदेश सरचिटणीसावर वाळू चोरीचा गुन्हा दाखल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे यांच्यावर शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी येथील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यासाठी आणलेला वाळूसाठा चोरून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिंगेवाडीच्या सरपंच रंजना तानवडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पिंगेवाडी येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून सिमेंट कॉक्रींट रस्त्याचे बांधकाम करण्यात येत होते. या रस्त्यासाठी ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार तहसीलदार व मंडल अधिकारी यांच्या परवानगीने 5 जून 2023 रोजी 30 ब्रास वाळू उपलब्ध करण्यात आली होती. ही वाळू येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात ठेवण्यात आली होती. पंरतु कंत्राटदार उदय मुंढे व अरूण भाऊसाहेब मुंढे यांनी 23 ऑगस्ट 2023 रोजी रात्री जेसीबी व ट्रकमधून चोरून नेला. याबाबत सरपंच रंजना तानवडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

मात्र, राजकीय दबावापोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने सरपंच रानवडे यांनी उच्च न्यायायाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिक दाखल केली होती. यावर निकाल देताना न्यायालयाने तहसीलदारांना व पोलीसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी (दि.24) शेवगाव पोलीस ठाण्यात मुंगी येथील मंडल अधिकारी अय्या फुलमाळी यांच्या तक्रारीनुसार अरूण मंढे व उदय मुंढे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप पदाधिकार्‍यांची अधिकार्‍यांच्या बदलीची मागणी

भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे व त्यांचे बंधू उदय मुंढे यांच्यावरील वाळू चोरीचे खोटे गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत. खोटी पोलीस केस दाखल करणार्‍या अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करत भाजपच्या पदाधिकार्‍यांनी शनिवारी एकत्र येत शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांना निवेदन दिले. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोकुळ भाऊ दौंड, पाथर्डीचे माजी सभापती संभाजीराव पालवे, पाथर्डीचे भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, धनंजय बडे, दिलीप खेडकर, अमोल सागडे, संजय कीर्तने, गुरुनाथ माळवदे बाळासाहेब कोळगे, संजू मरकड यांच्यासह शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : वक्फ बोर्ड विधेयकावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंना टोला; म्हणाले…

0
मुंबई । Mumbai वादग्रस्त वक्फ दुरुस्ती विधेयक बुधवारी (२ एप्रिल) लोकसभेत मांडण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. प्रश्नोत्तराच्या तासानंतर दुपारी १२ वाजता नवं वक्फ दुरुस्ती...