मुंबई | Mumbai
ठाण्यात (Thane) ठाकरे गटाच्या एका महिलेला शिंदे गटाच्या काही महिला कार्यकर्त्यांनी मारहाण (Beating) केल्याची घटना घडली. त्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासमवेत ठाण्यातील रुग्णालयात जाऊन या महिलेची विचारपूस केली.
यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करत “राज्याला फडतूस गृहमंत्री लाभलाय”, असा उल्लेख केला होता. त्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून उद्धव ठाकरेंच्या या टीकेला आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी धमकीवजा इशारा देत प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले…
बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी आपली मर्यादा ओलांडली तर भविष्यात आम्हाला आमची मर्यादा ओलांडावी लागेल. उद्धव ठाकरे जिथे जातील, तिथे भाजप रस्त्यावर उतरेल. यानंतर देवेंद्र फडणवीसांबद्दल काही अपशब्द बोलाल तर राज्याचा अध्यक्ष म्हणून मी उद्धव ठाकरेंना सांगतो की, आज तुम्हाला शेवटची संधी दिली आहे. तसेच येथून पुढे बोललात तर लक्षात ठेवा. तुम्हाला सोडणार नाही, याला धमकी समजा, अशा शब्दांत बावनकुळेंनी इशारा दिला.
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांची लगीनघाई; लवकरच उरकणार साखरपुडा!
पुढे ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याकडे बाळासाहेबांचे टाचणीभरही गुण नाही. मुलगा म्हणून सोडले तर उद्धव ठाकरेंकडे ना बाळासाहेबांचे विचार आहे, ना त्यांच हिंदुत्व आहे, ना तसं कर्तृत्व आहे. त्यामुळे त्यांची आमच्या नेत्याबद्दल बोलायची पात्रता नसून ते नैराश्य आल्याप्रमाणे वागत आहेत, असे बावनकुळे यांनी म्हटले.