Sunday, April 27, 2025
Homeराजकीय"तुमचा हिरवा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही"; बावनकुळेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

“तुमचा हिरवा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही”; बावनकुळेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई | Mumbai

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ठाण्यातील सभेवेळी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी (MNS Worker) उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर नारळ, शेण आणि बांगड्या फेकल्या होत्या. त्यामुळे या राड्यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तर या राड्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या भगवा सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपला (BJP) लक्ष्य करत टीकेचा बाण सोडला होता. त्यानंतर आता ठाकरेंच्या या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले.

- Advertisement -

हे देखील वाचा : “महाराष्ट्रात गोंधळ घालण्यासाठी दिल्लीच्या अहमदशाह अब्दालीने काही नेत्यांना…”; ठाण्यातील राड्यानंतर राऊतांचा मनसेवर निशाणा

यावेळी बोलतांना बावनकुळे म्हणाले की,”औरंगजेब फॅन क्लबचे म्होरके जनाब उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन राममुक्त भाजप करायची बोंब ठोकली. पण हे तुम्हाला या जन्मात तरी शक्य होणार नाही. कारण तुम्ही मतांसाठी उबाठा गट हिरवा करून घेतला. छत्रपती शिवरायांचा वारसा सोडून तुम्ही औरंगजेबाच्या वारसदारांच्या पालख्या वाहत आहात. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, तुमच्या सारख्या औरंगजेबी वृत्तीला कशी धूळ चारायची हे इथल्या मावळ्यांना ठाऊक आहे. आता तर शिवरायांची वाघनखंही महाराष्ट्रात आली आहेत. यामुळे यांचं वाघनखांच्या साक्षीने येणाऱ्या निवडणुकीत मतांच्या शस्त्राने जनता तुमचा हिरवा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही”, असा पलटवार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी ठाकरेंवर केला.

हे देखील वाचा : Hindenburg Report च्या आरोपांवर सेबीच्या अध्यक्षा माधवी बुच काय म्हणाल्या?

तसेच “लांड्या, लबाड्या आणि धूळफेक करून तुम्ही जास्त दिवस लोकांना फसवू शकणार नाहीत. तुमच्या रॅलीतील हिरवे झेंडे जनता विसरली नाही. लोकसभेला आम्ही तुमचे नऊ खासदार निवडून दिले, मग वक्फ बोर्डाची बाजू का घेत नाही? असं म्हणत मातोश्रीबाहेर मुस्लिम समाजाने आंदोलनही केले. भगवं सोडून हिरवं पांघरलं की असंच होणार आहे. ही सुरुवात आहे तुमच्या अधोगतीची. वैयक्तिक स्वार्थासाठी तुम्ही वंदनीय बाळासाहेबांना (Balasaheb) विसरलात, जनता तुम्हाला माफ करणार नाही”, अशी टीकाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : महिला प्रवाशाची पर्स चोरट्याने केली लंपास, पोलिसांत तक्रार...

0
शिरूर । तालुका प्रतिनिधी शिरूर परिसरात एका प्रवाशाची पर्स अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या चोरीत १६ ग्रॅम सोन्याचे दागिने, ८८ हजार रुपये...