Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्यामनोज जरांगेंच्या सभेनंतर भाजपने शेअर केला फडणवीसांचा 'तो' VIDEO

मनोज जरांगेंच्या सभेनंतर भाजपने शेअर केला फडणवीसांचा ‘तो’ VIDEO

मुंबई | Mumbai

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे आज मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा झाली. मराठा समाजाला आरक्षण द्या, ही आता शेवटची मागणी आम्ही करत आहोत. दहा दिवसांत आरक्षण मिळाले नाही तर पुढे जे काही होईल, त्याला सरकार जबाबदार राहील, अशा निर्वाणीचा इशारा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

- Advertisement -

दरम्यान, जरांगे यांच्या सभेनंतर भाजपने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा जुना व्हिडीओ ट्वीट केला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही कटीबध्द, असं ट्वीट महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन करण्यात आलं. त्यामुळे मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न लवकरच मिटणार का? अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

भाजपने ट्वीट केलेला व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस भाषण करताना दिसून येत आहेत. मराठा समाजाची देखील आरक्षणाची मागणी आहे, ही मागणी योग्य आहे. मागच्या काळात आम्ही मराठा समाजाला आरक्षण (Maratha Aarakshan) दिलं होतं. ते हायकोर्टाने वैध ठरवलं होतं. मात्र, प्रकरण सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर त्यावेळचं सरकार आरक्षण टिकवू शकलं नाही, असं फडणवीस आपल्या भाषणात म्हणत आहेत.

आम्हाला विश्वास आहे, की हो… मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊन दाखवू, आणि आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणला आम्ही धक्का लागू देणार नाही, ज्या प्रकारे आम्ही कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. त्याच प्रकारे आम्ही पुन्हा मराठा समाजाला आरक्षण देऊ, त्यासाठी सरकार कठीबद्ध आहे, असंही फडणवीस आपल्या भाषणात म्हणताना दिसून येत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या