Sunday, September 8, 2024
Homeमुख्य बातम्या“...त्यासाठी १४५ आमदार लागतात”; नाव न घेता मोहित कंबोज यांचा अजित पवारांवर...

“…त्यासाठी १४५ आमदार लागतात”; नाव न घेता मोहित कंबोज यांचा अजित पवारांवर वार, नंतर ट्वीट डिलीट

मुंबई | Mumbai

गत काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच अजित पवार मुख्यमंत्री व्हावं असं साकडं त्यांच्या समर्थकांनी लालबाग राजाच्या चरणी घातलं आहे. यावरुन अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रियाही उमटत आहे.

- Advertisement -

“2024च्या आधीच भाजपात…”; संजय राऊतांचा मोठा दावा

त्यावर भाजप नेते मोहित कंबोज यांनी निशाणा साधला आहे. मोहित कंबोज यांनी आपल्या एका ट्विटद्वारे मुख्यमंत्री होण्यासाठी ४५ नव्हे तर १४५ सदस्यांची गरज असते असे म्हटले आहे. याद्वारे त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. पण या ट्विटमुळे वाद होताच त्यांनी काही वेळातच ते डिलीट केले. दरम्यान, यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटते की अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना तसेच वाटते, काँग्रेसमध्ये १५ नेते मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत, असे बावनकुळेंनी म्हंटले आहे.

भाजपला झटका! दक्षिणेतील मोठ्या मित्रपक्षानं सोडली साथ, लोकसभेपूर्वी चिंता वाढली

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या