Friday, October 23, 2026
HomeनगरAhilyanagar : महानगरपालिकेतही राज्यात भाजपच नंबर वन ठरणार - पंकजा मुंडे

Ahilyanagar : महानगरपालिकेतही राज्यात भाजपच नंबर वन ठरणार – पंकजा मुंडे

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगरपालिका निवडणुकीत भाजपने प्रभावी कामगिरी केलेली आहे. महानगर पालिका निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात फिरतांना भाजपसाठी चांगली परिस्थिती दिसत आहे. यामुळे या निवडणुकीत भाजपच राज्यात एकनंबरचा पक्ष ठरणार असल्याचा विश्वास भाजप नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. शनिवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माजी खासदार डॉ.सुजय विखे, आ. संग्राम जगताप, आ. मोनिकाताई राजळे आदी सोबत होते.

- Advertisement -

बदलापूर येथील अत्याचार प्रकरणात सहआरोपी असणार्‍या व्यक्तीला भाजपने स्वीकृत नगरसेवक केले या विषयावर मला काहीही माहीती नाही. या विषयावर माहिती घेवून बोलेल असे सांगत राज्यातील जनतेने गोपिनाथ मुंडे यांच्यावर अतोनात प्रेम केले असल्याचे मुंडे यांनी यावेळी सांगितले. ठाकरे बंधू यांच्यासह पवार बंधू आणि सुप्रिया सुळे यांच्या एकत्र येण्यावर थेट बोलणे मुंडे यांनी यावेळी टाळले.

ताज्या बातम्या

कर्ज

अनेक बँकांत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

0
मुंबई | Mumbaiराज्यातील एकापेक्षा अधिक बँकांमध्ये पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर...