Sunday, September 8, 2024
Homeमुख्य बातम्या“2024च्या आधीच भाजपात...”; संजय राऊतांचा मोठा दावा

“2024च्या आधीच भाजपात…”; संजय राऊतांचा मोठा दावा

मुंबई | Mumbai

ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी आज एक मोठं विधान केलं आहे. संजय राऊत यांनी थेट भाजप आणि एनडीएचं भवितव्य वर्तवणारं विधान केलं आहे. 2024 पूर्वी भाजपचे (BJP) भवितव्य कसे असणार? एनडीएचे काय होणार? याचा गौप्यस्फोटच राऊत यांनी केला आहे. मात्र राऊत यांच्या विधानावर अनेक राजकीय तर्कवितर्कही लढवले जात आहेत.

- Advertisement -

खासदार संजय राऊत हे पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी थेट भाजप फुटणार असल्याचा दावा केला आहे. एमआयडीएमके हे एनडीएमधून बाहेर पडले, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, भाजपच्या नेतृत्वाखील सध्याचे एनडीए ही एक नौटंकी आहे. इंडिया निर्माण झाल्यानंतर पाटणा आणि बेगंलुरूमध्ये बैठका झाल्या. यानंतर भाजपला एनडीएची आठवण झाली नाही तर तोपर्यंत त्यांना एनडीएची आठवण झालेली नव्हती. मग भाजपने इकडून तिकडून लोक गोळा केली आणि दिल्लीमध्ये एनडीएम म्हणून बैठक घेतली. एनडीएमध्ये कोण आहेत. जर शिवसेना आणि अकाली दल नसेल. तर ती एनडीए शून्य आहे. एनडीएची ताकद ही शिवसेना आणि अकाली दल होती. शिवसेनाच नाही आहे. मग बाकीचे लोक येतात आणि जातात. एनडीए अस्तित्वात नाही. एनडीए ही एक नौटंकी आहे. एनडीएमध्ये तुम्हाला आज जे काही चित्र दिसत आहे. ते लोक देखील राहतात की नाही याबद्दल मला शंका आहे. किंबहुना मी तुम्हाला सांगतो की, 2024च्या आधी भाजप देखील फुटलेला असेल.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, यावेळी संजय राऊतांनी आमदार अपात्रता सुनावणीच्या मुद्द्यावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना लक्ष्य केलं. कुणीतरी काल म्हणालं की आम्ही विधानसभा अध्यक्षांवर दबाव आणतोय. दबाव काय असतो? हा सर्वोच्च न्यायालयाचा दबाव आहे. आमचा नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार बोलतो आहोत. विधानसभा अध्यक्षांनी घटनेनुसार शपथ घेतली आहे. त्याआधी एक वकील म्हणूनही त्यांनी सनद घेताना शपथ घेतली आहे. आमदार म्हणूनही शपथ घेतली आहे. त्यांनी घटनेचं रक्षण करण्याची शपथ घेतली. पण त्यांच्या कारकिर्दीत गेल्या एका वर्षापासून महाराष्ट्रात घटनेचा, कायद्याचा खून होताना मला दिसतोय. त्यावर त्यांना काही वाटत नसेल, तर या विधिमंडळाच्या काळ्याकुट्ट इतिहासातलं एक पान त्यांच्या नावाने लिहिलं जाईल, असं राऊत म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या