Saturday, April 26, 2025
Homeराजकीय'भाजयुमो'च्या प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी अंकित संचेती

‘भाजयुमो’च्या प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी अंकित संचेती

नाशिक । प्रतिनिधी

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सदस्यपदी अंकित संचेती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटिल यांनी पत्र जारी करुन ही नियुक्ति केली. संघटन कौशल्याच्या जोरावर राज्यभरात युवा मोर्चा संघटन वाढवणे व युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय देणे ही जबाबदारी संचेती यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

संचेती यांनी यापुर्वी प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियानाचे राष्ट्रिय महासचिव (युवा) म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. या व्यतिरिक्त जैन आर्गनायजेशनशी जुळलेले असून ते सामाजिक कार्य करत आहे.

आॅल इंडिया जैन काॅन्फरन्सचे युवा राष्ट्रिय सचिव म्हणून ते कार्यरत आहे. त्यांची भाजपच्या युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी नियुक्ति झाल्याने अभिनंदन केले जात आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अमित

गृहमंत्री अमित शहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना आदेश; महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांबाबत धक्कादायक माहिती...

0
मुंबई | Mumbai जम्मू-काश्मीरमधील पहलगाम मधल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान काश्मीर...