Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजविधानसभा निवडणूक २०२४ : भाजपचे दिनकर पाटील यांचा मनसेत प्रवेश; नाशिक पश्चिम...

विधानसभा निवडणूक २०२४ : भाजपचे दिनकर पाटील यांचा मनसेत प्रवेश; नाशिक पश्चिम मधून मनसेकडून उमेदवारी जाहीर

नाशिक | प्रतिनिधी Nasik

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीसाठी कालपासून (दि.२२) राज्यभरात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही. पंरतु, महायुतीकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. महायुतीचे उमेदवार जाहीर झाल्याने घटक पक्षांतील तिन्ही पक्षांत काही प्रमाणावर नाराजी समोर आली आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांनी बंडखोरीचे हत्यार उपसण्यास सुरुवात केली आहे.

नाशिक पश्चिम मतदारसंघातून भाजपकडून विद्यमान आमदार सीमा हिरे यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यामुळे विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या दिनकर पाटील यांचा चांगलाच हिरमोड झाला होता. त्यानंतर काल त्यांनी मेळावा घेत भाजपाने अकरा वर्षात सातत्याने आश्वासनांवरच बोळवण केलेली असून, प्रत्येकवेळी पक्षाने डावलले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री करतो, अथवा पंतप्रधान करतो असा जरी शब्द दिला तरी माघार घेणार नाही, असे म्हणत यंदाची विधानसभा लढणार आणि जिंकणारच असा निर्धार व्यक्त केला होता.

या नंतर दिनकर पाटील यांनी आज सायंकाळी साडे सात वाजता मुंबई येथे राजगड निवासस्थानी राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत पक्षप्रवेश केला आहे. त्यासाठी ते कार्यकर्त्यांसह मुंबईला रवाना झाले होते.दरम्यान दिनकर पाटील यांना मनसेकडून नाशिक पश्चिम मतदार संघातून उमेदवारी जाहीर झाली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...