मुंबई | प्रतिनिधी
शिवसेनेच्या 58व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन सोहळा मुंबईच्या षण्मुखानंद सभागृह येथे झाला. उद्धव ठाकरे या कार्यक्रमात काय बोलणार याचे सर्वांचे लक्ष होते. यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्राथमिक सदस्य नोंदणी मोहिमेचा शुभारंभ आजच्या दिवशी करण्यात आला.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पुन्हा एनडीएसोबत जायचं का? असा उपरोधिक प्रश्न विचारत त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला.शिवसेना संपविनाऱ्या भाजप सोबत आपण कदापीही जाणार नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.मग भुजबळ शिवसेनेत जाणार. भुजबळ माझ्याशी बोलले नाहीत. ते मंत्री आहेत ते बघतील काय करायचं. मात्र सांगड घालण्याचा आणि अपयश झाकण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जातोय. विषय वळवायचा कसं हे भाजपाला चांगलं कळलं आहे.शिवसेना प्रमुखांनी दोन गोष्टी मला सांगितल्या आहेत एक आहे म्हणजे आत्मविश्वास आणि माणसाला अहंकार असू नये असे सांगत त्यांनी भाजपवर निशाना साधला.
दरम्यान लोकसभा निवडणुकीत मिळालेलं यश हे माझे यश नसून खऱ्या यशाचे मानकरी तुम्ही आहात. काही क्षण असे येतात की भावना व्यक्त करणं कठिण होतं. लोकसभा निवडणुकीनंतर आपला शिवसेनेचा हा पहिला कार्यक्रम आहे. ज्या ज्या देशभक्तांनी महाविकास आघाडीला मतदान केलं आशीर्वाद दिलं. त्यात दलित मुस्लिम, बौद्ध ख्रिश्चन आले शीखही आले. सर्वांना धन्यवाद देतो. लोकसभा निवडणुकीत भाजपला तडाखा बसलाय अशीदेखील भावना उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.
हे सरकार चालेल असं वाटत नाही. चालू नये असंच वाटतं. सरकार चालेल का पडेल का नाही. पडलेच पाहिजे. पुन्हा निवडणुका झाल्याच पाहिजे. पडलं तर आम्ही इंडिया आघाडीचं सरकार स्थापन करू असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला.