Monday, June 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBlack Monday: टॅरिफ वॉरमुळे जगात खळबळ! 'ब्लॅक मंडे'त कोणत्या देशाचे शेअर मार्केट...

Black Monday: टॅरिफ वॉरमुळे जगात खळबळ! ‘ब्लॅक मंडे’त कोणत्या देशाचे शेअर मार्केट सगळ्यात जास्त कोसळले?

मुंबई | Mumbai
अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देशांवर अतिरिक्त व्यापारकर लादल्यानंतर शेअर बाजारावर त्यांच्या या निर्णयाचा परिणाम झाला आहे. यामुळे आज (सोमवारी) जगभरातील सर्वच शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. परस्पर शुल्काचा आंतरराष्ट्रीय बाजारांवर नकारात्मक परिणाम होत आहे. यात खुद्द अमेरिकेसोबत अनेक देशांचे शेअर बाजारांत मोठी घसरण झाली आहे.

सोमवारी सकाळी शेअर बाजार उघडल्यावर बाजारात मोठी घसरण पहायला मिळाली. बाजार उघडताच जपानचा निक्केई २२५ अंकांनी घसरला. ऑस्ट्रेलियाचा एस अँड पी २०० ६.५ टक्क्यांनी घसरून ७१८४.७० वर, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी ५.५ टक्क्यांनी घसरून २३२८.५२ वर आला. भारतात बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स ३००० तर निफ्टी ११०० अंकांनी घसरला. तत्पूर्वी, शुक्रवारी अमेरिकन नॅस्डॅक बाजार सुमारे ७ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला होता. तज्ज्ञांच्या मते ही घसरण काहीच नाही, जर परिस्थिती नियंत्रित केली नाही तर अमेरिकन बाजाराची स्थिती १९८७ सारखी होऊ शकते.

- Advertisement -

दरम्यान, शेअर बाजार तज्ज्ञ आणि सीएनबीसीचे होस्ट जिम क्रॅमर यांनी काही दिवसांपूर्वीच सोमवार (७ एप्रिल) शेअर बाजारासाठी ‘ब्लॅक मंडे’ ठरेल असे भाकीत केले होते. त्यांनी म्हटले होते की, बाजारात आज १९८७ च्या “ब्लॅक मंडे” नंतरची एका दिवसातील सर्वोत मोठी घसरण होईल. १९८७ मध्ये, अमेरिकेचा डाऊ जोन्स इंडस्ट्रियल निर्देशांक एका दिवसात सरासरी २२.६ टक्क्यांनी घसरला होता.

ते पुढे म्हणाले की जर ट्रम्प यांनी नियमांचे पालन करणाऱ्या देशांना आणि कंपन्यांना प्रोत्साहन दिले नाही तर आपल्याला १९८७ सारखे दृश्य दिसू शकते. २ एप्रिल रोजी ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर किमान १० टक्के टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली होती. यानंतर अमेरिकन बाजारात मोठी घसरण झाली. डोऊ जोन्स, नॅस्डॅक आणि एस अँड पी ५००. तिन्ही निर्देशांकांमध्ये मोठी घसरण दिसून आली. डाऊ जोन्स २२०० हून अधिक अंकांनी घसरला आणि ५.५० टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. त्याच वेळी नॅस्डॅक ९०० अंकांनी घसरला आणि ५.८२ टक्क्यांनी घसरला. तर एस अँड पी ५०० मध्ये ५.९७ टक्क्यांनी मोठी घसरण झाली.

अर्थतज्ज्ञ जिम क्रेमर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन याबाबत इशारा दिला आहे. ते म्हणाले, की १९८७ सारखी परिस्थिती जगाला परवडणारी नाही. १९ ऑक्टोबर १९८७ मध्ये, डाऊ जोन्स एका दिवसात २२.६ टक्क्यांनी घसरला, जो आतापर्यंतचा सर्वात मोठा एकदिवसीय क्रॅश मानला जातो. त्यावेळी या घटनेने अमेरिका हादरली आणि नंतर अनेक आर्थिक धोरणे बदलण्यात आली.हे संकट केवळ अमेरिकेपुरते मर्यादित राहिले नाही, तर युरोप, आशिया आणि भारतातील बाजारपेठांनाही या घसरणीचा फटका बसला. गुंतवणूकदारांचे अब्जावधी डॉलर्स बुडाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Jalgaon MLC Election : जळगाव विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे महाजन विजयी; मविआच्या...

0
जळगाव | प्रतिनिधी | Jalgaon विधानपरिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून अपेक्षेप्रमाणे महायुतीचे (Mahayuti) नंदकिशोर महाजन (Nandkishor Mahajan) मोठया मतधिक्याने विजयी झाले आहे. महाजन...