Monday, September 7, 2026
Homeक्राईमCrime News : ब्लॅकमेल करत विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार

Crime News : ब्लॅकमेल करत विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणार्‍या विद्यार्थिनीला तिच्यासोबत काढलेले सेल्फी फोटो व्हायरल करण्याची व पालकांना पाठविण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात वांबोरी (ता. राहुरी) येथील फरहान सादिक शेख याच्याविरूध्द मंगळवारी (21 जुलै) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा एमआयडीसी हद्दीत घडल्यामुळे तो तपासकामी वर्ग करण्यात आला आहे.
अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात राहणारी पीडित विद्यार्थिनी (वय 18) अहिल्यानगर येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. फरहान शेख हाही त्याच महाविद्यालयात शिक्षण घेत असून दोघांमध्ये मैत्री होती.

- Advertisement -

सुमारे सहा महिन्यांपूर्वी फरहान याने दोघांचे सेल्फी फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढले होते. त्यानंतर हे फोटो पालकांना पाठविण्याची धमकी देत त्याने विद्यार्थिनीवर मानसिक दबाव निर्माण केला. त्यामुळे भीतीपोटी ती त्याच्याशी संपर्कात राहू लागल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादीनुसार, 2 मार्च आणि 18 मार्च रोजी फरहानने विद्यार्थिनीला डोंगरगण येथे फिरण्यासाठी येण्यास भाग पाडले व अत्याचार केल्याचा आरोप आहे.

तसेच संशयिताने अर्धनग्न अवस्थेतील व्हिडिओ पाठविण्याची मागणी केली. फोटो व्हायरल करण्याच्या भीतीमुळे विद्यार्थिनीने स्नॅपचॅटव्दारे व्हिडिओ पाठविल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतरही संशयित आरोपीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याने पीडिताने घरी जाऊन संपूर्ण प्रकार आईला सांगितला. त्यानंतर दोघींनी तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली.

ताज्या बातम्या

मनोज

मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे महत्वाचे पाऊल; शिक्षणातील सवलती, रखडलेला...

0
मुंबई | Mumbaiमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या दहा दिवसांपासून उपोषणाला बसले असून आता राज्य सरकारने मराठा, कुणबी आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास...