Thursday, February 5, 2026
Homeजळगावसर्वसामान्यांचा आशीर्वाद हीच माझी ताकद - आ.चंद्रकांत पाटील

सर्वसामान्यांचा आशीर्वाद हीच माझी ताकद – आ.चंद्रकांत पाटील

मुक्ताईनगर | प्रतिनिधी

मुक्ताईनगर मतदारसंघाचा विकास हाच ध्यास असून सर्वसामान्यांचा विश्वास आणि आशीर्वाद हीच माझी ताकद मला विजय मिळवून देईल असा आशावाद महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांनी व्यक्त केला. ते बोदवड तालुक्यात प्रचार रॅली काढण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते.

- Advertisement -

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) हे असून मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात मुक्ताईनगर रावेर बोदवड अशा तालुक्यांचा समावेश आहे.
मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघ क्षेत्रातील सर्वच गावांना महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी भेटी देऊन मतदार संघाच्या विकासासाठी महायुतीच्या उमेदवारालाच मतदान करा असे आवाहन करीत आहेत. यात मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेले आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांची पत्नी व त्यांच्या कन्या सुद्धा मतदार संघातील प्रत्येक गावात प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून तरुण वृद्ध माता भगिनी यांच्याशी संवाद साधत मतदानासाठी रॅली काढत आहेत.

YouTube video player

बोदवड तालुक्यातील मनुर, चिखली, वडजी, जामठी या गावांमध्ये दि.९ नोव्हेंबर रोजी प्रचार रॅली काढण्यात आली. सदर प्रचार रॅलीला ग्रामीण व शहरी भागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे याप्रसंगी ठिकठिकाणी महिलांनी चंद्रकांत पाटील यांचे औक्षण केले त्याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी सदैव कटिबद्ध असून मतदार संघाचा विकास हाच त्यांचा ध्यास असून केवळ जनतेचा विश्वास व आशीर्वाद हीच त्यांची ताकद असल्याचे त्यांनी याप्रसंगी चंद्रकांत पाटील म्हणाले. या प्रचार मिरवणुकीमध्ये शिवसेना-भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट आरपीआय आठवले गट अशा महायुती चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

अभिभाषणावर

Loksabha Session: संसदेत २००४ नंतरची पहिलीच अशी घटना, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तराशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर आभार प्रस्ताव लोकसभेत मंजूर करण्यात आला. २००४ नंतर ही...