Saturday, September 14, 2024
Homeमुख्य बातम्यापरमपूज्य वै. बस्तीरामजी सारडा यांच्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिर

परमपूज्य वै. बस्तीरामजी सारडा यांच्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिर

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

परमपूज्य वै. बस्तीरामजी सारडा यांच्या 57 व्या पुण्यतिथी ( Late. Bastiramji Sarda 57th death anniversary ) निमित्त येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालय ( Sheth B.N.Sarda Vidyalaya) व ‘ दै. देशदूत’ ( Daily Deshdoot ) ने आज (दि. 19) रक्तदान शिबिराचे (Blood Donation Camp )आयोजन केले होते. सारडा विद्यालयात आयोजित रक्तदान शिबिरात 95 रक्तदात्यांनी रक्तदान करीत वै. सारडा यांना अनोख्या पध्दतीने आदरांजली वाहिली. शिबिराचे हे पाचवे वर्ष आहे.

- Advertisement -

‘सिन्नर बिडी उद्योग समूहा’ चे संचालक श्रीरंग सारडा Srirang Sarda, Director, Sinnar Bidi Industries Group व ‘देशदूत’ चे कार्मिक व्यवस्थापक सुनील ठाकूर ( Sunil Thakur, Personnel Manager, Deshdoot ) यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यापूर्वी वै. सारडा यांच्या अर्धपुतळ्याचे पूजन करण्यात आले.

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष एम. जी. कुलकर्णी, शालेय समितीचे अध्यक्ष बापूसाहेब पंडित, समाधान गायकवाड, अनिल करवा, रावसाहेब आढाव, सायकलिस्ट असोसिएशनचे संदीप ठोक, प्रभारी प्राचार्य दीपक जाधव, आयटीआयचे प्राचार्य सोनवणे, सरदवाडीच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जेजूरकर, संजीवनीच्या मुख्याध्यापिका गोसावी व्यासपिठावर उपस्थित होते.

संघर्षमय जीवन किती यशस्वी होऊ शकते वै. बस्तीरामजी सारडा यांच्या जीवनप्रवासाकडे पाहिल्यानंतर लक्षात येते असे कुलकर्णी म्हणाले. रक्तदानाची परंपरा निर्माण करणार्‍या सिन्नर संकूलांचे कार्य अभिमानास्पद असल्याचे ते म्हणाले. प्राचार्य जाधव यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचलन राहूल मुळे यांनी सूत्रसंचलन करत वै. बस्तीरामजी सारडा यांच्या आठवणी सांगितल्या. कांतीलाल राठोड यांनी आभार मानले.

शाळेची परंपरा कौतुकास्पद

आजोबांना पाहू शकलो नाही. मात्र, त्यांच्याबद्दल खूप ऐकले आहे. त्यांनी माणसामाणसात कधी भेदभाव केला नाही. घरात आजींमुळे वारकरी सांंप्रदायाचे संस्कार झाले असल्यामूळे आम्हीही असा भेदभाव करु शकत नाही. रक्तदान केल्यानंतर ते रक्त कुणाकडून आलं ते पाहिलं जात नाही, तसाच हा प्रकार आहे. इतक्या वर्षानंतरही आजोबांची पूण्यतिथी साजरी करण्याची शाळेची परंपरा कौतुकास्पद असल्याचे श्रीरंग सारडा म्हणाले.

माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार

आजच्या रक्तदान शिबिरात माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार डोळ्यात भरणारा होता. काही विद्यार्थ्यांनी सपत्नीक येऊन रक्तदान केले. अनेक विद्यार्थी शाळेच्या ऋृणातून उतराई होण्याच्या भावनेतून दरवर्षी न विसरता रक्तदान करण्यासाठी येत असल्याचे दिसत होते. साईकृपा फाउडेशन व माहेश्वरी समाजाचे कार्यकर्तेही नेहमीच्या उत्साहाने रक्तदान करत होते. रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी निघाल्याने अनेक महिलांना ईच्छा असूनही रक्तदान करता आले नाही. स्वत: सारडा, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. जयसिंह सांगळे, प्राचार्य जाधव यांनीही रक्तदान करत दात्यांचा उत्साह वाढवला.

वै. बस्तीरामजी सारडा यांच्या पावलावर पाऊल ठेवत सारडा कुटुंबीय वाटचाल करीत आहेत. सिन्नर तालुका हा विडी उद्योगासाठी सर्वत्र ओळखला जात होता. मात्र, वै. सारडा यांनी 1940 मध्ये काडीपेटीचा कारखाना सुरु करुन तालुक्याच्या औद्योगिकीकरणाचा पाया रचला. त्यामुळेच सिन्नर तालुक्याने उद्योगनगरी म्हणून संपूर्ण देशात नावलौकिक निर्माण केला आहे. सारडा उद्योग शतकोत्तर महोत्सव साजरा करत आहे. त्यांच्याच उदार देणगीमूळे स्वत:ची ओळख निर्माण करणारी शाळाही सन 2024-25 मध्ये शतक महोत्सव साजरा करणार आहे.

बापूसाहेब पंडित

प्रतीक्षा घटली

शिबिरात रक्त संकलनाचे काम जनकल्याण रक्तपेढीकडून करण्यात आले. नेहमीपेक्षा खुर्च्यांसह सेवकही जास्त असल्याने रक्तदात्यांची लांबच लांब रांग लागण्याची वेळ यंदा आली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या