Saturday, July 27, 2024
Homeदेश विदेशVIDEO : भारतीय किनारपट्टीवर आली पाच टन वजनी 'ब्लू व्हेल'; बघणाऱ्यांनी केली...

VIDEO : भारतीय किनारपट्टीवर आली पाच टन वजनी ‘ब्लू व्हेल’; बघणाऱ्यांनी केली एकच गर्दी

दिल्ली । Delhi

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. गुरुवारपासून पाऊस कमी झाला असला, तरी पाण्याचा प्रवाह अद्याप कमी झालेला नाही. दुसरीकडे, सततच्या पावसामुळे समुद्रही खवळलेला आहे. या खवळलेल्या समुद्राचा जलचरांवरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. हे दर्शविणारी एक घटना गुरुवारी उघडकीस आली.

- Advertisement -

श्रीकाकुलम येथील समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी एक ब्लू व्हेल वाहून आली. ही व्हेल सुमारे २५ फूट लांब आणि पाच टन वजनाची आहे. घटनास्थळावरील फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात जवळपासच्या गावातील लोक समुद्रकिनाऱ्यावर व्हेल पाहण्यासाठी जमलेले दिसत आहेत. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर ब्लू व्हेलचे आगमन दुर्मिळ असल्याचे स्थानिक मच्छिमारांचे म्हणणे आहे. यामुळे बघ्यांची गर्दी जमली होती. तर, काही जण सेल्फीही काढत होते.

पुण्यातील अपघाताचा थरारक VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, “देव तारी त्याला कोण मारी!”

ब्ल्यू व्हेल हा पृथ्वीवरील सर्वात मोठा जलचर प्राणी असून त्याचे वजन २०० टन ( ३३ हत्तीच्या वजना इतके ) असू शकते. त्याच्या हृदयाचा आकार एका volkswagen beetle कारच्या आकाराचे असते. त्यांच्या पोटोत एक टन क्रिल शेल फिश सामावू शकतात. त्यांना दिवसभरात चार टन क्रिल शेल फिशची गरज असते. अंटार्टिंका भवतालच्या समुद्रात मोठे देवमासे या क्रिल शेल फिशवरच गुजराण करतात. ब्ल्यू व्हेलचा आवाजही सर्व प्राण्यात मोठा असतो. त्याचा आवाज जेट इंजिनपेक्षाही जास्त असतो. विश्व वन्यजीव महासंघाच्या माहीतीनूसार त्यांचा आवाज १८८ डेसिबलपर्यंत पोहचू शकतो. एका जेटचा आवाज १४० डेसिबल इतका असतो. कमी आकाराच्या ब्ल्यू व्हेलचा आवाज शेकडो मैल पोहचू शकतो. ते अन्य ब्ल्यू व्हेलला हाक मारण्यासाठी या अशा प्रकारची शिट्टी मारतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या