Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBMC Election 2026 : काँग्रेसची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर;...

BMC Election 2026 : काँग्रेसची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात कुणाला संधी?

मुंबई | Mumbai

महापालिका निवडणूकांसाठी प्रत्येक पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर करत एबी फॉर्म वाटण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काही उमेदवारांनी (Candidate) आज (सोमवारी) अर्ज देखील भरले आहेत. शिवसेना ठाकरे गटाने ६०, भाजपने ६६ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मुंबईसाठी ३८ जणांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता काँग्रेसने देखील आपली ७० जणांची उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

- Advertisement -

काँग्रेसने (Congress) अधिकृतपणे ट्विटर हँडलवरुन उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. आपली मुंबई घडवूया, मुंबईच्या (Mumbai) हितासाठी काँग्रेसला निवडूया, असे काँग्रेसने ट्विटमध्ये म्हटले आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मविआ म्हणून काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक एकत्रपणे लढवण्यासाठी विरोध दर्शवला होता. यानंतर ठाकरे गटापाठोपाठ काँग्रेसने आपली पहिली यादी घोषित केली आहे.

YouTube video player

ताज्या बातम्या

Nashik Crime : पोलीस चौकीवर दगडफेक करणारे अटकेत

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik पोलीस चौकीवर (Police Chowki) दगड फेक करून फरार झालेल्या दोघा संशयितांना गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने सीसीसीटीव्हीच्या...