Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBMC Mayor: मुंबईची सोडत जाहीर होताच महायुतीकडून महापौरपदासाठी 'ही' नावं चर्चेत

BMC Mayor: मुंबईची सोडत जाहीर होताच महायुतीकडून महापौरपदासाठी ‘ही’ नावं चर्चेत

मुंबई | Mumbai
राज्यातील २९ महानगर पालिकांसाठी महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. या आरक्षण सोडतीनुसार, मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा महिला राज आले आहे. मुंबई महापालिका ही सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहे. त्यामुळे मुंबईची धुरा ही महिलेच्या हाती जाणार, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे आपला महापौर बसवण्याचे स्वप्न भंगलं आहे.

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असेलेल्या मुंबई महापालिकेची धुरा आता महिला सांभाळणार आहे. त्यामुळे आता महायुतीतील कोणत्या महिला नगरसेवकाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार याची चर्चा रंगू लागली आहे. या नावांपैकीच कोणा एका महिला नगरसेवकाच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार आहे.

- Advertisement -

मोठी बातमी! जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या बुलेटप्रुफ वाहनाचा भीषण अपघात; १० जवान शहीद, सात जवान जखमी

YouTube video player

ही सोडत जाहीर झाल्यानंतर भाजपच्या गोटातील पाच नावे सध्या महापौरपदासाठी आघाडीवर आहेत. त्यात प्रभाग क्रमांक १३२ घाटकोपरमधून निवडून आलेल्या रितू तावडे, अलका केरकर आणि तेजस्वी घोसाळकर यांची नावे आघाडीवर आहेत. त्याचबरोबर राजश्री शिरवाडकर, शीतल गंभीर यांची नावे देखील चर्चेत आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे, वॉर्ड क्रमांक 98 च्या नगरसेविका अलका केरकर यांनी याआधी उपमहापौर पदाची धुरा संभाळली आहे. त्यामुळे यंदा महापौरपद मिळावे, यासाठी त्या आग्रही आहेत. तर, वॉर्ड क्रमांक 132 च्या नगरसेविका रितू तावडे सुद्धा महापौरपदासाठी आग्रही असून त्यांनी यापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे.

ताज्या बातम्या

Suicide News : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नवीन घर घेण्यासाठी आणि धंदा टाकण्यासाठी माहेरून पैसे आणण्याच्या कारणावरून होणार्‍या छळाला कंटाळून बोल्हेगाव उपनगरात राहणार्‍या विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली....