मुंबई | Mumbai
महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस उरले असून राजकीय पक्षांकडून आज महायुती व महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब होऊ शकते. मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस आणि वंचितची आघाडी जाहीर झाली असून दुसरीकडे शरदचंद्र पवार पक्षाची राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात आघाडी होण्याची शक्यता आहे. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असल्यामुळे आजचा दिवस महत्वाचा आहे. असे असतानाच महायुती म्हणून भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना निवडणूक लढणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राजकीय डावपेच आखायला सुरुवात केली आहे.
मुंबईत राजकिय हालचालींना वेग आला असून आज काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने आघाडी जाहीर झाली असून, दुसरीकडे शरदचंद्र पवार पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात आघाडीची चर्चा सुरू आहे. असे असतानाच एकनाथ शिंदेंनी मोठा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. एकनाथ शिंदे आज मुंबईतील 60 माजी नगरसेवकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.
हे ही वाचा: काल उमेदवारी अर्ज दाखल; आज अचनाक कृष्णराज महाडिकांची माघार, नेमकं काय घडलं?
शिवसेना उबाठा आणि इतर पक्षातून शिवसेना शिंदे गटात आलेल्या ६० माजी नगरसेवकांना एकनाथ शिंदेनी बोलावले आहे. त्यामध्ये, २०१७ सालचे ३९ आणि इतर पक्षांचे २१ मिळून सध्या ६० माजीनगरसेवकांची संख्या एकनाथ शिंदेंकडे आहे. एकनाथ शिंदेनी या ६० माजी नगरसेवकांचे तिकिट फायनल केल्याची माहिती आहे. त्यानुसार, नंदनवन या निवासस्थानी आज या सर्व माजी नगरसेवकांना एकनाथ शिंदे कानमंत्र देणार आहेत. या माजी नगरसेवकांना नंदनवन येथे उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या बैठकीत निवडणूक रणनीतीसह काही उमेदवारांना थेट एबी फॉर्मही वाटप होण्याची शक्यता आहे.
शिवसेना उबाठामधून आणि इतर पक्षातून आलेल्या सर्वच माजी नगरसेवकांना तिकीट फायनल करण्यात आले आहे. मुंबईतील नगरसेवकांसोबत आज एकनाथ शिंदे संवाद साधणार आहेत, दुपारी ४ वा मुंबईतील सर्व माजी नगरसेवकांना शिंदेंकडून नंदनवन येथे उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीत निवडणुकांच्या नियोजनासह काही उमेदवारांना AB फॉर्म वाटले जाऊ शकतात. नगरसेवकांना येताना उमेदवारी संदर्भातील कागदपत्रे घेऊन बोलवण्यात आले आहे.




