Wednesday, February 11, 2026
Homeमुख्य बातम्याBMC Mayor : तब्बल ४४ वर्षांनंतर भाजपची स्वप्नपूर्ती; महापौरपदी रितू तावडे विराजमान,...

BMC Mayor : तब्बल ४४ वर्षांनंतर भाजपची स्वप्नपूर्ती; महापौरपदी रितू तावडे विराजमान, उपमहापौरपदी शिंदे सेनेचे संजय घाडी

मुंबई | Mumbai

बहुचर्चित मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी (BMC Mayor) भाजपाच्या रितू तावडे (Ritu Tawade) तर उपमहापौरपदी शिंदे शिवसेनेचे संजय घाडी (Sanjay Ghadi) विराजमान झाले आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. तब्बल ४४ वर्षांनतर मुंबई महापलिकेत भाजपचा दुसरा महापौर बसला आहे. त्याआधी भाजपचे निष्ठावान असलेले डॉ. प्रभाकर पै हे १९८२ ते १९८३ सालामध्ये मुंबईचे महापौर झाले होते. महापालिका निवडणुकीनंतर महापौरपदासाठी भाजप आणि शिंदे सेनेत रस्सीखेच सुरु होती. अखेर भाजपच्या रितू तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आणि त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज पदभार स्वीकारला.

- Advertisement -

आज (बुधवार) महापौर निवडीआधी भाजप (BJP) आणि ठाकरे सेनेच्या (Shivsena UBT) नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. भाजप नगरसेवकांनी हुतात्मा चौक येथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर महायुतीचे सर्व नगरसेवक मुंबई महापालिकेत हजर झाले. यावेळी पालिका सभागृहात महायुतीचे नगरसेवक (Corporator) आल्यावर जोरदार शंखनाद करण्यात आला. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांमध्ये उत्साह संचारल्याचे बघायला मिळाले. यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी जय श्रीराम आणि मोदी-मोदीच्या घोषणा देऊन पालिका सभागृह दणाणून सोडले होते.

YouTube video player

भाजप नगरसेवकांनी ‘मोदी-मोदी’च्या घोषणा दिल्यानंतर दुसरीकडे ठाकरे सेनेच्या नगरसेवकांनी अचानक ‘चोर है, चोर है’, अशा घोषणा दिल्या. त्यामुळे भाजप नगरसेवकांनी घोषणा थांबविल्या. यानंतर ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी’ठाकरे-ठाकरे’ नावाचा जयघोष सुरु केला. या घोषणांमुळे राजकीय वातावरण चांगलेच गरम झाल्याचे दिसून आले. महापौर निवडीच्या दिवशीच ठाकरे सेना आणि भाजप आमनेसामने आल्याने पुढील पाच वर्ष दोन्ही पक्षांमध्ये चांगलाच संघर्ष होण्याची शक्यता आहे.

कोण होते भाजपचे पहिले महापौर ?

मूळचे कर्नाटकचे असलेले डॉक्टर प्रभाकर पै यांचा उडपीतील बारकूर या गावी जन्म झाला होता. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या प्रभाकर यांना समाजसेवेची आवड होती. त्यामुळे ते मुंबईत आले. डॉ. पै हे १९६८ मध्ये पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले.त्यानंतर १९६८ ते १९८४ या कालावधीत त्यांनी नगरसेवक म्हणून काम केले. त्याच कालावधीत म्हणजे १९८२ ते १९८३ या काळात त्यांनी भाजपचे मुंबईचे महापौरपद भूषवले होत. याशिवाय डॉ. पै यांनी बेस्ट समितीचे अध्यक्ष आणि आरोग्य समितीचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.

ताज्या बातम्या

Revati Sule : माझ्या लेकीचं लग्न ठरलं! सुप्रिया सुळेंनी दिली गुड...

0
मुंबई । Mumbai राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सदानंद सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. सुप्रिया सुळे यांनी...