मुंबई
अभिनेत्री कंगना रणावतच्या मुंबईतील कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून तोडण्याची कारवाईची सुरुवात झाली आहे. त्यानंतर कंगना यांनी टि्वट केले ‘याद रख बाबर, यह मंदिर फिर बनेगा’
मुंबई व मुंबई पोलिसांविरुद्ध वक्तव्य केल्यामुळं कंगना शिवसेनेच्या रडारवर आली होती. मुंबईत भीती वाटत असेल तर स्वत:च्या राज्यात निघून जाण्याचा सल्ला शिवसेनेने कंगनाला दिला होता. संजय राऊत व शिवसेनेशी वादामुळे कंगना आता मुंबई पालिकेच्याही रडारवर आली. ९ सप्टेंबरला ती मुंबईत येणार होती. त्यासाठी तिला केंद्र सरकारने वाय श्रेणीची सुरक्षा दिली.
दरम्यान आज सकाळी कंगनाच्या मुंबईतील वांद्रे याठिकाणी असणाऱ्या कार्यालयामधील तळमजल्यावर पालिकेचे कर्मचारी पोहचले. त्यांनी तिच्या कार्यालय तोडण्यास सुरुवात केली आहे. याठिकाणी बेकायदेशीर बदल झाल्याचा आरोप पालिकेकडून करण्यात आला होता. बेकायदेशील बदलांसाठी पालिकेने मंगळवारी नोटीस देखील बजावली होती. नोटीशीला २४ तास उलटल्यावनंतर पालिकेकडून कारवाई सुरु झाली.
पालिकेच्या करावाईनंतर कंननाने एकापाठोपाठ चार टि्वट केले. ती म्हणते, ’यह एक इमारत (ऑफिस) नहीं, राम मंदिर है, आज वहां बाबर आया है।’
कंगनाचा बंगला निवासी आहे. त्यात कार्यालय सुरू करण्यासाठी रीतसर परवानगी घेणे गरजेचे होते. पालिका अधिनियम ३५४ (अ) अंतर्गत कोणत्याही निवासी जागेचा व्यावसायिक वापर करता येत नाही. बंगल्यामध्ये चटईक्षेत्र नियमांचे उल्लंघन आढळले. तसेच एकूण १४ ठिकाणी नियमबाह्य बांधकाम करण्यात आल्याचे निदर्शनास आले