अहमदाबाद l Ahmedabad
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाची (BCCI) ८९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) गुरुवारी अहमदाबादमध्ये (Ahmedabad) झाली. या बैठकीमध्ये आयपीएल मध्ये (IPL) मध्ये खेळवल्या जाणााऱ्या टीमबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
२०२२ मध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएल स्पर्धेसाठी बीसीसीआयने दोन नव्या संघांना परवानगी दिली आहे. त्यामुळे २०२२ मध्ये होणाऱ्या स्पर्धेत विजेतेपदासाठी १० संघ झुंजताना दिसतील. बीसीसीआयची गुरुवारी ८९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या बैठकीत 2022 च्या स्पर्धेसाठी दोन नवीन संघांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आयपीएलमध्ये दोन नव्या संघांसाठी अदानी ग्रुप आणि गोएंका हे शर्यतीत आहेत. अदानी ग्रुप व संजिव गोएंका ग्रुप आयपीएलचा नवा संघ खरेदी करण्यासाठी उत्सुक आहेत. यापैकी एक संघ हा अहमदाबादचा असेल आणि तो अदानी ग्रुप खरेदी करण्याची शक्यता अधिक आहे. दुसऱ्या संघासाठी कानपूर, लखनौ आणि पुणे यांच्या नावाची चर्चा आहे. संजिव गोएंका ग्रुपनं २०१६व २०१७ च्या आयपीएलमध्या रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघ मैदानावर उतरवला होता आणि त्या संघाला अनुक्रमे सातव्या व दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. PTIनं दिलेल्या वृत्तानुसार २०२२ च्या आयपीएलमध्ये दोन नव्या संघांच्या समावेशावर सर्व सदस्यांनी सकारात्मकता दर्शवली.
१० संघांचा समावेश म्हणजे होम-अवे असे एकूण ९४ सामने होतील आणि त्यामुळे स्पर्धेचा कालावधीही वाढेल. शिवाय क्रिकेटच्या ऑलिम्पिक समावेशाबाबतही बीसीसीआयनं सकारात्मकता दर्शवली आहे, परंतु त्यांनी ICCकडून काही मुद्द्यांवर स्पष्ट मत मागितले आहे.