फैजपूर Faizpur ( प्रतिनिधी ) –
फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याचे (Madhukar Sahakari Sugar Factory) संचालक मंडळ (Board of Directors) बरखास्त (dismissed) होऊन प्रशासक यांची नियुक्ती (Administrator appointed) करण्यात आली आहे.
प्रादेशिक सहसंचालक (साखर )औरंगाबाद यांचे दिनांक १३/६/२०२२ रोजीचे आदेशान्वये मधुकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड (Madhukar Sahakari Sugar Factory) या साखर कारखान्याचे संचालक मंडळ (Board of Directors) बरखास्त (dismissed) करून व्ही .एम. गवळी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था जळगाव यांची प्राधिकृत अधिकारी (Administrator appointed)म्हणून नियुक्ती केलेली आहे.
सदरील आदेश हा दिनांक १७ /६/२०२२ रोजी प्राप्त झालेला आहे. मधुकर कारखाना जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ताब्यात असल्याने प्रशासक गवळी व जिल्हा बँक चेअरमन गुलाबराव देवकर व संचालक मंडळ यांनी कारखाना सुरू करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचारी यांनी केले आहे.