Monday, June 24, 2024
Homeदेश विदेशभीषण अपघात! बोट बुडाल्याने २६ जणांना जलसमाधी; अनेक जण बेपत्ता

भीषण अपघात! बोट बुडाल्याने २६ जणांना जलसमाधी; अनेक जण बेपत्ता

नाजयर | Naiger

- Advertisement -

नायजेरियात (Nigera Boat Accident) भीषण अपघात झाला असून बोट उलटून (26 People Drowned) २६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात अनेक जण बेपत्ता झाले असून, अनेकांचा शोध सुरू आहे. नायजेरियामध्ये या आधीही बोट उलटून अपघात घडले आहे. या आधी ही घडलेल्या बोट दुर्घटनेमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे.

नायजेरियातील नायजर प्रांतातील मोकवा (Mokwa) येथे बोटीतून प्रवास करताना बुडून मृत्यू झालेल्या लोकांमध्ये बहुतांश महिला आणि मुले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली असून या भागात घडलेली ही दुसरी घटना आहे. अद्याप पर्यंत या दुर्घटनेमध्ये २६ जणांचे मृतदेह हाती लागले असून अनेक जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे.

Ind vs Pak : राखीव दिवशीही भारत-पाकिस्तान सामना रद्द झाल्यास काय होणार? काय असेल समीकरण?

नायजर प्रांताच्या स्थानिक प्रवक्ते जिब्रीम मुरेगी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात झाला तेव्हा या बोटीवर १०० पेक्षा जास्त प्रवासी होते, त्यात महिला आणि मुलांची संख्या अधिक होती. ही बोट गबाजीबो वरुन तुंगान मांगोच्या दिशेने जात होती. या भागात शेती असल्याने जास्त करुन शेतकरी प्रवासी या बोटीतून प्रवास करत होते.

राज्यपालांचे प्रवक्ते बोलगी इब्राहिम यांनी सांगितले की, या दुर्घटनेमध्ये २६ जणांचा मृत्यू झाला असून यात महिला आणि बालकांची संख्या जास्त आहे. तर या अपघातानंतर आत्तापर्यंत ३० जणांना वाचवण्यात यश आले आहे. नायजर राज्य आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेच्या सहकार्याने सागरी पोलीस आणि स्थानिक गोताखोर पाण्यात बुडालेल्या लोकांचा शोध घेत आहेत.

दरम्यान, याच भागात तीन महिन्यांपुर्वी अशीच बोट दुर्घटना घडली होती. या अपघातात १०० हुन अधिक लोकांचा बुडाल्याने मृत्यू झाला होता. नायजर राज्यातील दुर्गम भागात हा अपघात झाला. या अपघाताचे कारण बोटीचे वजन जास्त असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. अलिकडच्या काळात नायजेरियात घडलेला हा अशा प्रकारचा सर्वात मोठा अपघात होता. या अपघातानंतर नायजेरियाच्या वाहतूक व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या