Monday, June 24, 2024
Homeनगरबोधेगाव येथे शॉक लागुन युवकाचा मृत्यू

बोधेगाव येथे शॉक लागुन युवकाचा मृत्यू

बोधेगाव |प्रतिनिधी| Bodhegav

- Advertisement -

बोधेगाव येथील अनिल यादव तोतरे या युवकाचा विद्युत पंपात विजेचा शॉक बसून मृत्यु झाला आहे. अनिल यादव तोतरे हा युवा शेतकरी शुक्रवारी (दि.9) घराशेजारी असलेल्या विहिरीवर विद्युत पंप सूरू करण्यासाठीं गेला होता. पावसामुळे जमीन ओलसर होऊन वीजप्रवाहाचा जबरदस्त झटका त्याला बसला.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ मदतीला धावून गेले. त्यांनी अनिल यास तातडीने उपचारासाठी शेवगाव येथे हलवले मात्र उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना घटनेचा पंचनामा केला आहे. सदर युवकाची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. त्याच्या पश्चात लहान मुलगा, दोन मुली, पत्नी, वृध्द आई असा परिवार आहे. कुटूंबातील कर्ता युवक गेल्याने कुटुंब उघड्यावर पडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या