Sunday, March 30, 2025
Homeजळगावलाचखोर पुरवठा अव्वल कारकून अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

लाचखोर पुरवठा अव्वल कारकून अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

बोदवड – 

येथील तहसील कार्यालय पुरवठा विभागातील अव्वल कारकुन संजय देविदास पाटील (वय 41, रा.देवपूर, जि.धुळे, कर्मचारी वर्ग क्र.3) यांनी बोदवड येथील स्वस्त धान्य दुकानदारांच्या अंतर्गत येणार्‍या तीन इसमांचे नवीन रेशनकार्ड बनविण्यासाठी प्रत्येकी 1200 रुपये प्रमाणे तीन रेशनकार्ड बनविण्याच्या मोबदल्यात दि.12 डिसेंबर 2019 रोजी तक्रारदार यांचेकडे यांनी पंचासमक्ष 3600 रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी जळगाव लाचलूचपत विभागाकडे केली होती.

- Advertisement -

या प्रकरणी लाचेची पडताळणी करून लाचेची रक्कम स्विकारतांना आरोपी लोकसेवक यांना दि.12 डिसेंबर 2019 रोजी बोदवड तहसिल कार्यालयात रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई लाचलूचपत पोलिस अधीक्षक नाशिक सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक लाचलूचपत प्रतिबंध विभाग नाशिक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव लाचलूचपत विभागाचे डीवायएसपी जी.एम.ठाकूर, पोनि निलेश लोधी, पोनि संजोग बच्छाव, पोकॉ अशोक अहिरे, पोना मनोज जोशी, जनार्दन चौधरी, पोकॉ प्रशांत ठाकूर, प्रविण पाटील, नासिर देशमुख, ईश्वर धनगर या जळगाव लाचलूचपत विभागाच्या पथकाने केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

..तर 1 एप्रिल पासून राहुरी शहर बेमुदत बंद ठेवणार – प्राजक्त...

0
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri हिंदूस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबनेची घटनेला तीन ते चार दिवस होऊनही पोलिसांनी आरोपींना अद्यापही अटक केलेली नाही. घटनेतील...