Wednesday, February 4, 2026
HomeनगरRahuri : देवळाली प्रवरा येथे विहिरीत तरूणाचा मृतदेह आढळला

Rahuri : देवळाली प्रवरा येथे विहिरीत तरूणाचा मृतदेह आढळला

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Deolali Pravara

देवळाली प्रवरा शहरातून बिरोबावाडीच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यालगत असलेल्या विहिरीत (Well) तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. सदर तरुणाची आत्महत्या की घातपात? याबाबत चर्चेला उधाण आले आहे. सुनील बाळासाहेब तुपे (वय 32, रा. लाख रोड, देवळाली प्रवरा) असे मृत तरुणाचे नाव आहे.

- Advertisement -

आज मंगळवार दि. 20 रोजी सकाळच्या सुमारास बिरोबावाडी रस्त्यालगत असलेल्या संजय टिक्कल यांच्या विहिरीच्या कडेला पडलेल्या बेवारस अवस्थेत एक दुचाकी व दुचाकी शेजारी चप्पला संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. ही बातमी वार्‍यासारखी शहरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. काही सुजान नागरिकांनी घटने बाबत राहुरी पोलिस ठाणे (Rahuri Police Station) व देवळाली प्रवरा पालिका प्रशासनाला (Deolali Pravara Municipal Administration) माहिती दिली.

YouTube video player

प्राथमिक अंदाजानुसार दुचाकीस्वाराची गाडी व चप्पल त्याठिकाणी आढळून आल्याने तो विहिरीत (Well) पडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यानुसार खात्री करण्यासाठी शोधमोहीम हाती घेण्यात आली. पट्टीचे पोहणारे तसेच नगपरिषद व्यवस्थापन पथक यांच्या मदतीने विहिरीत गळ टाकून शोध घेतला असता मृतदेह (Dead Body) गळाला लागला. मृतदेह विहीरी बाहेर काढला असता तो सुनील बाळासाहेब तुपे यांचा असल्याचे समजले. दरम्यान, तुपे यांनी आपली जीवनयात्रा का संपवली? याबाबतचे नेमके कारण काय? हे समजू शकले नाही. पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव देणार?;...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सध्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' ही सर्वाधिक चर्चेची आणि लोकप्रिय ठरलेली योजना आहे. मात्र, आता ही योजना केवळ महिलांच्या...