येवला | प्रतिनिधी Yeola
- Advertisement -
तालुक्यातील देवळाणे शिवारातील विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळून आला. यशराज रविंद्र बोर्डे (वय १८, रा. देवळाणे असे मृत तरुणाचे नाव आहे. तंत्र निकेतनचे शिक्षण घेत असणारा यशराज गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होता. आज, गुरुवारी, (दि. २१) सकाळी त्याचा मृतदेह विहिरीत आधळून आला.
मृत्यूपूर्वी यशराज ने लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या मानसिक अवस्थेबद्दल लिहिलं असून, त्यातून तो खूपच निराश आणि तणावात असल्याचं दिसून येत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
मृतदेह पाण्या बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.




