Sunday, September 8, 2024
Homeब्रेकिंग न्यूजगोदावरी नदीत वाहून गेलेल्या 'त्या' तरुणाचा मृतदेह सापडला

गोदावरी नदीत वाहून गेलेल्या ‘त्या’ तरुणाचा मृतदेह सापडला

कोपरगाव | प्रतिनिधी | Kopargaon

दारणा धरणातून (Darna Dam) गोदावरी नदीला (Godavari River) विसर्ग सोडण्यात आल्याने पाण्याच्या प्रवाहात नदीच्या किनारी असलेल्या विद्युत मोटारी व पाईप वाहून जाऊन नये यासाठी पाईप व विद्युत मोटार बाहेर काढण्यासाठी कारवाडी-हंडेवाडी येथील शेतकरी संतोष भिमाशंकर तांगतोडे (वय २५ ) हे काल सकाळच्या सुमारासं नदीमध्ये गेले असता पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्याने संतोष भिमाशंकर तांगतोडे हा तरुण (Youth) पाण्यामध्ये वाहून गेल्याने बेपत्ता झाला असल्याची घटना काल गुरुवारी घडली होती. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शोध कार्य दुसऱ्या दिवशी देखील तहसीलदार संदिपकुमार भोसले यांच्या उपस्थितीमध्ये सुरु असताना शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बेपत्ता तरुणाचा मृतदेह (Body) सापडण्यास प्रशासनाला यश आले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : गुंडाला जंगी मिरवणूक भाेवली; युनिट एकने केली दाेघांना अटक

कोपरगाव तालुक्यातील (Kopargaon Taluka) हंडेवाडी-मंजूर येथील गोदावरी नदीवरील कोल्हापूर टाईपचा मंजूर बंधारा असून या पुलाजवळ शेतकरी संतोष भिमाशंकर तांगतोडे (वय २५), अमोल भिमाशंकर तांगतोडे (वय ३०), प्रदिप भिमाशंकर तांगतोडे (वय २८) व नारायण भिकाजी तांगतोडे (वय ५२) हे गोदावरी नदीच्या पात्राला पाणी येणार असल्याने मोटारी काढण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने संतोष वाहत चालल्याचे नदी किनारी शेळी चारण्यासाठी आलेल्या ताईबाई छबुराव पवार व छबुराव बाबूराव पवार शेतकऱ्यास निदर्शनास येताच ताईबाई पवार यांनी आपली स्वतःची नेसलेली साडी सोडून तरूणांच्या दिशेने फेकून त्यातील अमोल व प्रदीप या दोघांना आधार देऊन वाचवण्यात त्याना यश आले. त्यात संतोष हा तरुण वाढत्या प्रवाहात वाहून गेल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : स्थानबद्धतेचा कालावधी पूर्ण करुन परतताच तडिपाराची जंगी मिरवणूक; गुन्हा दाखल

त्यानंतर प्रशासनाच्या सहकार्याने पोहणाऱ्या तरुणांनी शोधकार्य सुरू केले. अमोल व प्रदिप हेही पाण्यामध्ये गुदमरले होते परंतु छाती दाबून उलटे करून पोटातून पाणी काढण्यात आले व त्यांच्यावर हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू असून तब्येत बरी असल्याचे सांगितले जाते. तर प्रशासनाच्या सहकार्याने पोहणाऱ्या तरुणांनी काल सायंकाळी उशिरापर्यंत शोधकार्य सुरू केले. मात्र, सायंकाळपर्यंत शोध लागू शकला नसल्याने दुसऱ्या दिवशी देखील बोटीच्याद्वारे शोधमोहीम सुरु असताना दुपारच्या सुमारास मृतदेह हा तरंगून वरती आल्याचे काही ग्रामस्थांच्या लक्ष्यात येताच त्यांनी तहसीलदार भोसले यांना कळवताच कोपरगाव नगरपदिषदेच्या नगरपरिषदेच्या रेस्क्यू टीमच्या बोटीद्वारे सदर मृतदेहला बाहेर काढण्यात आले.

हे देखील वाचा : Nashik Fraud News : निवृत्त महिला ब्रिगेडिअरचे दीड काेटी लांबविले

दरम्यान, आरोग्य विभाग व फायर ब्रिगेडचे प्रमुख सुनील आरण, तहसीलदार संदिपकुमार भोसले ,नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, मंडळाधिकारी नानासाहेब जावळे,तलाठी दिपाली विधाते,पोलीस पाटील रामराजे भोसले,पथकाच्या मध्ये कालू अप्पा आव्हाड,संजय विधाते, प्रशांत शिंदे, किरन सीनगर, प्रमोद सीनगर, घनशाम कुऱ्हे, आकाश नरोडे, विशाल, कासार,सामाजिक कार्यकर्ते मंगेश औताडे आदिनी यांनी घटनास्थळी भेट देऊन शोध घेण्यासाठी परिश्रम घेतले आहे. सदर तरुणाच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबासाह मंजूर गावामध्ये मोठी शोककळा पसरली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या