Friday, June 19, 2026
Homeब्रेकिंग न्यूजविहिरीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

विहिरीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू

चांदोरी | वार्ताहर Chandori

- Advertisement -

खेरवाडी येथील भाऊसाहेब देवचंद आवारे यांच्या विहिरीमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर मृतदेह विहिरीत असल्याची माहिती मिळताच सायखेडा पोलीस अधिकारी यांनी तात्काळ आपत्ती व्यवस्थापन पथक चांदोरी यांना घटनास्थळी पाचारण केले.

आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. प्राथमिक अंदाजानुसार हा मृतदेह साधारणतः सहा ते सात दिवसांपूर्वीचा असून मृत व्यक्ती पुरुष असल्याचे समोर आले आहे.

या शोध आणि बचाव कार्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन पथक प्रमुख सागर गडाख, संतोष लगड, वैभव जमदाडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घुगे साहेब, मोठा भाऊ जाधव, लगड दादा पोलीस पाटील व इतर अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.

सदर घटनेबाबत पुढील तपास सायखेडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी व अधिकारी करत असून मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

ताज्या बातम्या

Kopargaon : कोपरगावात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

0
रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Ranjangaon Deshmukh राज्यात बंदी असलेल्या आणि संशयास्पद मानल्या जाणार्‍या एचटीबीटी (बोलगार्ड-3) कापूस बियाण्यांच्या बेकायदेशीर विक्रीचे रॅकेट कोपरगाव शहर पोलीस व कृषी विभागाच्या...