पिंपळनेर Pimpalner । वार्ताहर
साक्री तालुक्यातील बोफखेल ग्रामपंचायतीचा (Bofkhel Gram Panchayat) ठेका घेणे (take the contract) ग्रामपंचायत सदस्यांना (Gram Panchayat Members) चांगले भोवले आहे.
Photos # प्रकाशा येथे ट्रक – मिनी ट्रक मध्ये भीषण अपघातVISUAL STORY : आज आहे या लिंबु कलर अभिनेत्रीचा वाढदिवस… करिअरच्या यशोशिखरावर असतांनाच लग्न करून झाली अमेरीकेत सेटल
या पाच सदस्यांनी ग्रामपंचायतीचा कामाचा ठेका घेऊन त्याची रक्कम आपल्या खात्यात वर्ग केली होती. यावर आक्षेप घेत जितेंद्रकुमार भिवा कुवर याने अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात श्रीमती जमनाबाई मगन कुवर, संजय बाबा वळवी, रामचंद्र नथु कुवर, दीपक सुक्राम पवार, विलास माल्या वळवी, या ग्रामपंचायत सदस्याविरुध्द प्रत्यक्ष हितसंबंध असल्याचे पुराव्यानिशी दर्शविले.
VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरण
सदर सदस्यांच्या नावे धनादेश काढून रक्कम स्वतःच्या खात्यात वर्ग झाल्याचे पुरावे सादर केले. तसेच सदस्यांना अपात्र घोषित करावे, असा तक्रारी अर्ज केला. त्यावर अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी झाली. कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.
VISUAL STORY : हास्य जत्रेतील प्राजक्ताचा हा लुक पाहाल तर… काळीज होईल खल्लास…
त्यानुसार त्या ग्रामपंचायत सदस्यांनी स्वतःच्या नावे ठेके घेऊन ग्रामपंचायत अधिनियमाच्या उल्लंघनाचा ठपका ठेवत ग्रामपंचायत अधिनियम 1959च्या कलम 14(ग) नुसार जिल्हाधिकारी यांनी पाचही सदस्यांना अपात्र घोषित करत त्यांचे ग्रामपंचयात सदस्यत्व रद्द केले. तसे आदेश साक्री तहसीलदारामार्फत देण्यात आले आहेत.
लोक अदालतीने घरकुल लाभार्थ्यांना दिला हा इशारा…. अवकाळी पावसाचा मिरची उत्पादकांना फटका, लागवड धोक्यात