Monday, November 25, 2024
Homeधुळेबोगस बियाण्यांची साठवणूक भोवली

बोगस बियाण्यांची साठवणूक भोवली

दोंडाईचा dondaicha । श.प्र

मालपुर ता. शिंदखेडा येथील शेतकर्‍याने (farmer) संशयित बंदी (Banned) असलेले बोगस एसटीबीटी कापूस (Bogus STBT cotton seed) बियाणे साठवणूक (stored) केली म्हणून पंढरीनाथ सदाशिव भोई याच्याविरुद्ध विनापरवाना बियाणे साठवणूक केल्यामुळे बियाणे कायदा 1968, 1966 , 1989 कलमान्वये गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे. ज्या प्रकारे शेतकर्‍यावर कारवाई झाली तशाच प्रकारे शहरासह ग्रामीण भागातील कृषी केंद्रांची चौकशी करून असे बियाणे आढळून आल्यास कारवाई करण्याची मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

- Advertisement -

VISUAL STORY : गळ्यात नको ते घालून उर्वशी रौतेलाने केला कहर

याबाबत शिंदखेडा पंचायत समितीचे बियाणे निरीक्षक तथा कृषी अधिकारी अभय कोर यांना दि.19 मे रोजी दुपारी गुप्त माहितीच्या आधारे शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळील घरात विनापरवाना एसटीबीटी कापूस बियाणे ठेवल्याचे माहिती मिळाल्याने धुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी यांच्या परवानगीने गुणवत्ता निरीक्षक नितेंद्र पानपाटील व मनोज शिसोदे यांना माहिती देऊन दोंडाईचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मदतीने मालपुर येथे पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण धनगर व महिला पोलीस कॉन्स्टेबल शुभांगी पाटील यांच्या पथकाने मालपुर येथील ग्राम पंचायत कार्यालय जवळील घरात छापा टाकला असता संशयित एसटीबीटी कापूस सुटे बियाणे 20.680 किलोग्रॅम दर तीन हजार रुपये याप्रमाणे 62 हजार 40 चे बियाणे जप्त केले.

गावठी कट्ट्यासह एकास अडावद येथून अटक

त्या शेतकर्‍याला सदर बियाणे आपण का आणले याबाबत चौकशी केली असता त्यांनी स्वतःच्या शेतात लागवडीसाठी आणल्याचे सांगितले. त्याच्या घरात मिळून आलेले संशयित एसटीबीटी कापूस सुटे बियाणे 20.680 किलोग्रॅम पैकी एसटीबीटी बीटी प्रोटीन टेस्ट व उगवण क्षमता विश्लेषणासाठी 1.050 किलोग्रॅम बियाणे वापरून शिल्लक बियाणे 19.630 किलोग्रॅम जप्त करण्यात आले आहे.

अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे नियमक 1968, 1966,1989 चे नियम उल्लंघन केले व संशयित बंदी असलेले बोगस एचटीबीटी कापूस बियाणे साठवणूक केली म्हणून पंढरीनाथ सदाशिव भोई रा. मालपुर ता. शिंदखेडा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेम विवाह केल्याने तरुणासह कुटुंबीयांना मारहाण : गुन्हा दाखल

कृषी केंद्र चालकांचीही चौकशी करा

कापूस लागवडीचा हंगाम येत्या आठवड्यात सुरू होणार आहे. दरम्यान शहरासह ग्रामीण भागातील काही कृषी केंद्र चालक मान्यता नसलेला बियाणे चोर्‍याछुप्या पद्धतीने शेतकर्‍यांना विक्री करत असतात म्हणून कृषी विभागाने ज्याप्रमाणे शेतकर्‍यावर कारवाईचा बळगा उगारला त्याचप्रमाणे कृषी केंद्र चालकांवर देखील करडी नजर ठेवत अशा प्रकारे बियाणे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करावी म्हणजे शेतकर्‍यांची फसवणूक होण्यापासून आळा बसू शकतो अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या