Monday, June 24, 2024
Homeधुळेपुलावरून बोलेरो कोसळली ; मामा-भाची ठार

पुलावरून बोलेरो कोसळली ; मामा-भाची ठार

धुळे । प्रतिनिधी dhule

- Advertisement -

साक्रीनजीक असलेल्या शेवाळी रस्त्यावरील पुलावरुन बोलेरो कोसळल्याने मामा-भाची ठार झाल्याची घटना आज घडली. या अपघातात मामी जखमी झाली असून तिच्यावर साक्री रुग्णालयात उपचार सुरु आहे.

साक्री तालुक्यातील अंबोडे येथील सुभाष रुपला बागुल (वय 40) हे आज सकाळी पत्नी सौ.भारती बागुल (वय 38) व भाची मोहीनी (चिऊ) पांडूरंग साबळे (3) रा.कुडाशी हिच्यासह धुळ्याकडे निघाले होते. त्यांचे स्वतःचे बोलेरो (एमएच18/एएल 9528) या वाहनाने अंबोडेहून धुळ्याकडे येत होते. धुळ्यात त्यांची दोन्ही मुले हॉस्टेलला राहतात. पोळ्याची सुटी असल्याने ते मुलांना आपल्या गावी नेण्यासाठी ते धुळ्याकडे निघाले होते. आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास शेवाळी रस्त्यावर हॉटेल उदय पॅलेस जवळील पुलावरुन जात असताना त्यांचे वाहन पुलावरुन खाली कोसळले. या अपघातात सुभाष बागुल हे जागीच ठार झाले.

तर पत्नी भारती व भाची मोहिनी हे जखमी झाल्याने त्यांना धुळ्यातील हिरे रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, भाची मोहिनी ही रस्त्यातच मयत झाली. तर भारती यांच्यावर उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच साक्री पोलीस ठाण्याचे पीआय मोतीराम निकम यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या