Monday, September 28, 2026
HomeनगरCrime News : बोल्हेगावात तिरट जुगारावर पोलिसांचा छापा

Crime News : बोल्हेगावात तिरट जुगारावर पोलिसांचा छापा

सहा जण पकडले || 56 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बोल्हेगाव परिसरात सुरू असलेल्या तिरट नावाच्या हारजीतीच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत सहा मोबाईल, रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण 56 हजार 840 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मंगळवारी (11 ऑगस्ट) दुपारी 3.55 वाजता चोभे कॉलनी, गांधीनगर, बोल्हेगाव येथील एका घराच्या बाहेरील पडवीमध्ये काही जण तिरट नावाचा हारजीतीचा जुगार पैसे लावून खेळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली माहितीची खात्री करून कारवाई करण्यासाठी पोलिसांनी पंचांना सोबत घेतले आणि नमूद ठिकाणी छापा टाकला. छाप्यावेळी पोलिसांना पडवीमध्ये सहा जण जुगार खेळताना आढळून आले.

त्यांची नावे भाऊसाहेब राफायल बोर्डे (36), जुबेर शौकत पठाण (26), अभिषेक उर्फ पप्पू मोहन देठे (29), दीपक बाळकृष्ण शिरसाठ (34), सुशील काशिनाथ वाव्हळ (30) आणि प्रदीप प्रभाकर कदम (55, सर्व रा. बोल्हेगाव) अशी आहेत. पोलिसांनी पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून रोख रकमेसह विविध कंपन्यांचे मोबाईल फोन मिळून आले. ही कारवाई निरीक्षक मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार संदीप पवार, राहुल व्दारके, रमीझराजा आत्तार, अमृत आढाव आणि भगवान थोरात यांच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

NDCC News : निफाड कारखान्याच्या वसुलीवरून गदारोळ; जिल्हा बँक सर्वसाधारण सभेत...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Nashik District Bank) ७२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ऐनवेळच्या विषयात निफाड सहकारी साखर कारखान्याची थकबाकी...