Saturday, September 26, 2026
Homeक्राईमCrime News : बोल्हेगाव परिसरात दोन गटांत हाणामारी

Crime News : बोल्हेगाव परिसरात दोन गटांत हाणामारी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील बोल्हेगाव परिसरातील खंडोबानगर येथील मोरया पार्क हाऊसिंग सोसायटीमध्ये सामाईक बोअरवेलच्या मोटरची पिन काढण्याच्या कारणावरून दोन शेजारी कुटुंबांमध्ये वाद होऊन तो हाणामारीपर्यंत पोहोचला. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात फिर्याद दिल्याने तोफखाना पोलीस ठाण्यात परस्परविरोधी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन गटाचे सहा जण जखमी झाले आहेत.

- Advertisement -

महादेव जालिंदर साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बबलू युनुस शेख, त्यांची पत्नी मुस्कान शेख, मुलगा अयान शेख, पप्पू नावाच्या व्यक्तीसह अन्य काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींनी घरात घुसून शिवीगाळ करत मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. मारहाणीत फिर्यादीची पत्नी, बहिण, मेव्हणे व मुलगा जखमी झाले आहेत.

दरम्यान, याच घटनेप्रकरणी मुस्कान बबलू शेख यांनीही प्रतिफिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, दिपाली दिनेश पवार, महादेव जालिंदर साळुंके, दिनेश भिवा पवार, हर्षद महादेव साळुंके, पूजा महादेव साळुंके, ज्ञानेश्वर धोंडीबा साळुंके व अन्य काही जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपींनी घरात घुसून फिर्यादी व त्यांच्या मुलाला मारहाण केली. तसेच रायफलने ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. फिर्यादी व मुलगा जखमी झाला आहे.

ताज्या बातम्या

default-featured-image

Raj Thackeray : एसआयआर विरोधात ‘या’ तारखेला मुंबईत जनमोर्चा; मनसे-ठाकरे सेनेचा...

0
मुंबई | Mumbai देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांनी 'स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन' (एसआयआर) संदर्भातील काही निर्णय त्यांचे इतर दोन सहकारी सुखबीर सिंग...