Wednesday, May 29, 2024
Homeनगरबोल्हेगावात कामगाराने पळविली मालकाची दुचाकी

बोल्हेगावात कामगाराने पळविली मालकाची दुचाकी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मालकाचा विश्वास संपादन करून कामगाराने दुचाकी पळवून नेल्याची घटना मंगळवारी (दि. 18) सायंकाळी बोल्हेगाव उपनगरात घडली. याप्रकरणी बुधवारी (दि. 19) तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल संपत वाकचौरे (वय 28 रा. हनुमाननगर, बोल्हेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. शाहिद खान (मुळ रा. गोरखपुर, उत्तरप्रदेश, हल्ली रा. मनोलीयानगर, म्हसोबा चौक, बोल्हेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे.

- Advertisement -

विशाल वाकचौरे यांचे बोल्हेगावात सलुन दुकान असून शाहीद हा त्या दुकानावर कामगार होता. विशाल यांच्याकडे असलेल्या दुचाकीचा उपयोग शाहीद करत होता. मंगळवारी सायंकाळी शाहिद याने विशाल यांच्याकडून मावा आणण्यासाठी दुचाकी घेतली. दरम्यान, दुचाकी घेऊन मावा आणण्यासाठी गेलेला शाहीद पुन्हा आलाच नाही. विशाल यांनी त्याचा शोध घेतला, फोन केला परंतु तो मिळून आला नाही व फोनही बंद होता. त्यानंतर विशाल यांनी पोलिसांना माहिती देत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या