Wednesday, March 26, 2025
Homeमनोरंजनधक्कादायक ! प्रसिद्ध अभिनेता आसिफ बसरा'ची आत्महत्या

धक्कादायक ! प्रसिद्ध अभिनेता आसिफ बसरा’ची आत्महत्या

दिल्ली l Delhi

बॉलिवूड अभिनेता आसिफ बसरा यानं आत्महत्या केली आहे. हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे आसिफनं गुरुवारी मॅकलोडगंजमधील जोगिवाडा रोडवरील एका कॅफेजवळ आत्महत्या केली आहे. त्याने हे टोकाचं पाऊल का टाकलं आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. वयाच्या 53 व्या वर्षी अशाप्रकारे टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण बॉलिवूड हादरले आहे.

- Advertisement -

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. अशी माहिती मिळते आहे की, आसिफ बसरा गेल्या 5 वर्षांपासून मॅक्डोलगंज मध्ये भाड्याच्या घरात राहत होते, त्यांच्याबरोबर त्यांची एक विदेशी मैत्रिण देखील राहत असे.

आसिफ बसरा टीव्हीचा एक लोकप्रिय चेहरा होता. बॉलिवूडच्या अनेक सिनेमात त्याने काम केले आहे. परजानियां, ब्लॅक फ्राईडे या सिनेमात त्याने काम केले होते. हॉलिवूड सिनेमा ‘आऊटसोर्स’मध्येही तो दिसला होता. इमरान हाश्मीच्या ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ या सिनेमात त्याने इमरानच्या वडिलांची भूमिका साकारली होती.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 99 ग्रामपंचायतींची आज अंतिम मतदार यादी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे, तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका...