Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAsrani Passed Away : बॉलिवूडचे प्रसिध्द कॉमेडियन अभिनेते असरानी यांचं निधन

Asrani Passed Away : बॉलिवूडचे प्रसिध्द कॉमेडियन अभिनेते असरानी यांचं निधन

मुंबई | Mumbai

आपल्या अभिनयाच्या जोरावर कित्येक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे दिग्गज अभिनेते असरानी यांचे आज (20 ऑक्टोबर) वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. हिंदी सिनेसृष्टीत एक कसलेला आणि बहुआयामी अभिनेता म्हणून त्यांचा नावलौकिक होता. आतापर्यंत त्यांनी अनेक चित्रपटांत विनोदी तसेच इतर भूमिका साकारल्या.

- Advertisement -

ते गेल्या पाच दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होते. असरानी यांचं पूर्ण नाव गोवर्धन असरानी होतं. 1 जानेवारी 1941 ला त्यांचा जन्म जयपूरमध्ये झाला. 1960 ला त्यांचं करिअर सुरु झालं, त्यांनी 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांचं विनोदाचं टायमिंग आणि अनोख्या शैलीमुळं ते लोकप्रिय ठरले. शोले चित्रपटातील त्यांचं अंग्रेजो के जमाने के जेलर हा डालयॉग असणारी जेलरची भूमिका लोकप्रिय ठरली. खट्टा मीठा, चुपके चुपके या चित्रपटातील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या.

YouTube video player

असरानी यांनी सेंट झेविअर स्कूल, जयपूरमधून शिक्षण घेतल्यानंतर राजस्थान कॉलेजमध्ये पदवी पूर्ण केली. त्यानंतर असरानी यांनी रेडिओ आर्टिस्ट म्हणून काम केलं. असरानी यांच्या पत्नीचं नाव मंजू बन्सल इरानी आहे. असरानी यांनी 2004 मध्ये काँग्रेसचं सदस्यत्व घेतलं होतं. असरानी यांनी सिनेमा क्षेत्रात येण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागला, त्यांनी गुड्डी या चित्रपटातून पदार्पण केलं. तो सिनेमा देखील हिट ठरला.

अभिनयाबरोबर असरानी यांनी काही चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं. चला मुरारी हिरो बनने, सलाम मेमसाब, हम नही सुधरेंगे, दिल ही तो है या नावाचा सिनेमा दिग्दर्शित केला होता. त्यात जॅकी श्रॉफचा डबल रोल होता आणि दिव्या भारती आणि शिल्पा शिरोडकर अशा दोन अभिनेत्री त्यात होत्या. गुजराती सिनेमांचं दिग्दर्शन केलं होतं. गेल्या दशकात असरानी यांनी मराठी सिनेमात काम केलं होतं, अशी माहिती दिलीप ठाकूर यांनी असरानी यांच्या कारकिर्दीबाबत दिली.

ताज्या बातम्या

सोनिया

काँग्रेस खासदार सोनिया गांधींची तब्येत अचानक बिघडली; रुग्णालयात दाखल

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiकाँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी त्यांची...