मुंबई | Mumbai
अभिनेता फराझ खान (Faraaz Khan) याचे वयाच्या ४६ व्या वर्षी निधन झाले आहे. फराज बऱ्याच महिन्यांपासून आजारी होता. बंगळुरुच्या खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. अभिनेत्री पूजा भट्टने ट्विटरद्वारे फराज खानच्या मृत्यूची दुखःद बातमी चाहत्यांना दिली आहे.
पुजा भट्टने म्हटले आहे की, ‘मी खूप जड अंत:करणाने ही बातमी शेअर करत आहे की फराझ खान आता आपल्यात नाही. त्याला जेव्हा सर्वाधिक गरज होती त्यावेळी तुम्ही केलेली मदत आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद.’
फराझला न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरमुळे बेंगळुरूमधील रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. फराझ जवळपास एका वर्षापासून छातीमध्ये कफ आणि इन्फेक्शनशी झुंज देत होता. सलमानने त्याच्या सर्व मेडिकल बिल्सचा खर्च स्वत: दिला होता. कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मिरा शाहने याबबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. फराज खानने राणी मुखर्जीबरोबर मेहंदी, दुल्हन बनूं मैं तेरी आणि फरेब या सिनेमांसह अनेक सिनेमात काम केले होते. फरेबमधील त्याचं गाणं ‘तेरी आंखें झुकी झुकी’ विशेष लोकप्रिय झालं होतं.