Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजधक्कादायक! बॉलिवूड अभिनेता सलमान खानला 'या' देशानं 'दहशतवादी' म्हणून केलं घोषित…नेमकं काय...

धक्कादायक! बॉलिवूड अभिनेता सलमान खानला ‘या’ देशानं ‘दहशतवादी’ म्हणून केलं घोषित…नेमकं काय कारण?

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अभिनेता सलमान खानने सौदी अरेबियातील एका कार्यक्रमात बलुचिस्तान आणि पाकिस्तान यांचा वेगवेगळा उल्लेख केला. यावरून पाकिस्तानला चांगलीच मिरची लागली आहे. आता पाकिस्तानच्या शाहबाज सरकारने सलमान खानला थेट दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने यासंदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे. अँटी-टेररिज्म ॲक्ट अंतर्गत ही सलमान खानवर ही कारवाई करण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने सलमानला फोर्थ शेड्युलमध्ये टाकले आहे. म्हणजेच त्याला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. ही यादी दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत येते आणि त्या यादीतील व्यक्तींवर पाकिस्तानमध्ये कायदेशीर कारवाई होऊ शकते. यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

- Advertisement -

सलमान खान नेमकं काय म्हणाला?
सौदी अरेबिया येथे आयोजित जॉय फोरम 2025 मध्ये बोलतानाचा बॉलिवुड सुपरस्टार सलमान खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबदस्त व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने म्हटले आहे, “हे बलुचिस्तानातील लोक आहेत, अफगाणिस्तानातील लोक आहेत, पाकिस्तानातील लोक आहेत, प्रत्येक जण सौदी अरेबियामध्ये कष्टकरून कमवत आहे.” या विधानात त्याने बलुचिस्तानचे नाव पाकिस्तानपासून वेगळे घेतले. त्याच्या या एका विधानाने पाकिस्तानमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, शहबाज सरकारने त्यांला थेट दहशतवादी घोषित करत कायदेशीर कारवाईची तयारी केली आहे.

YouTube video player

बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणारे नेते मीर यार बलोच म्हणाले, “भारतीय अभिनेता सलमान खानने सौदी अरेबियामध्ये बलुचिस्तानचा उल्लेख केल्याने ६ कोटी बलुच नागरिकांना आनंद झाला आहे. सलमानने असे काही केलेय, जे प्रमुख देशही करण्यास कचरतात.” हा सांस्कृतिक मान्यतेचा संकेत असून सौम्य मुत्सद्देगिरीचे शक्तिशाली माध्यम’ असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर, यामुळे जगाला बलुचिस्तानला वेगळे राष्ट्र म्हणून मान्यता देण्यासाठी प्रेरणा मिळेल, असेही ते म्हणाले.

बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वाधिक खनिज समृद्ध पण आर्थिकदृष्ट्या सर्वात मागासलेला प्रांत आहे. येथील जनतेसोबत होणारा भेदभाव, यामुळे येथील जनतेत पाकिस्तानविरोधात मोठा असंतोष आहे. पाकिस्तानच्या गॅस उत्पादनातही त्याचा ४० टक्के वाटा आहे. या प्रांताचे धोरणात्मक महत्त्व असूनही पाकिस्तानच्या केंद्रीय नेतृत्वाने या प्रदेशाकडे सतत दुर्लक्ष केले. यामुळे 1948 मध्ये पाकिस्तानमध्ये सामील झाल्यापासून त्यांची स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव देणार?;...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सध्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' ही सर्वाधिक चर्चेची आणि लोकप्रिय ठरलेली योजना आहे. मात्र, आता ही योजना केवळ महिलांच्या...