Saturday, April 26, 2025
Homeमनोरंजनशाहरुख खानला मुंबई विमानतळावर रोखलं, नेमकं काय घडलं?

शाहरुख खानला मुंबई विमानतळावर रोखलं, नेमकं काय घडलं?

मुंबई | Mumbai

शाहरुख खान आणि त्याच्या टीमला शुक्रवारी रात्री उशिरा मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने अडवले.

- Advertisement -

सुमारे तासाभराच्या चौकशीनंतर शाहरुख खान आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी विमानतळावरून बाहेर पडताना दिसले, मात्र किंग खानचा अंगरक्षक रवी आणि टीमने कस्टमने पकडले.

वृत्तानुसार, शाहरुख खानची लाखो रुपयांची घड्याळे भारतात आणणे, बॅगेत महागड्या घड्याळांचे रिकामे बॉक्स सापडणे आणि कस्टम ड्युटी न भरल्याबद्दल चौकशी करण्यात आली. कस्टम विभागाच्या चौकशी आणि कारवाईत शाहरुखने सहकार्य केल्याचे समोर आले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या