Saturday, March 29, 2025
Homeमनोरंजनशाहरुख खानची चाहत्याला धक्काबुक्की; शाहरुखच्या कृतीमुळे नेटकऱ्यांमध्ये संताप

शाहरुख खानची चाहत्याला धक्काबुक्की; शाहरुखच्या कृतीमुळे नेटकऱ्यांमध्ये संताप

मुंबई | Mumbai

बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमुळे त्याला जोरदार ट्रोल केलं जातंय. शाहरुखला नुकतंच मुंबई विमानतळावर पाहिलं गेलं, यामध्ये शाहरुख एका व्यक्तीच्या हाताला धक्का देताना दिसत आहे.

- Advertisement -

यावेळी त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. तो विमानतळावर दाखल होताच चाहत्यांनी त्याच्याभोवती गर्दी केली होती, यावेळी तो घोळक्यातून शाहरुख पुढे जात असताना एक व्यक्ती त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करताच शाहरुखने या चाहत्याला ढकलून दिलं. यावेळेसचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘पठाणच्या यशानंतर शाहरुखला माज आला आहे’, असं नेटकरी म्हणत आहेत.

राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, मला…

हा व्हिडीओ समोर येताच किंग खानवर नेटकरी प्रचंड टीका करीत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करीत लिहिले आहे, “‘पठाण’ हिट झाला म्हणून लगेच इतका माज दाखवतोस?” तर आणखी एकाने लिहिले आहे, “तुझे हे वागणे चुकीचे आहे.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “हे सेलेब्रिटी मंडळी विसरतात की यांना सेलेब्रिटी कोणी बनवले.” आणखी एकाने लिहिले, “चाहते आहेत म्हणून तू आहेस.” त्यामुळे शाहरुख खानवर नेटकरी चांगलेच नाराज झालेले दिसत आहेत.

ताई दिल्लीत, दादा राज्यात… सुप्रिया सुळे होणार राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षा?

झिरो या चित्रपटानंतर तब्बल चार वर्षांनंतर शाहरुखचा ‘पठाण’ प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमने मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाने जगभरात दमदार कमाई केली. पठाणने बॉक्स ऑफिसवरील सर्व विक्रम मोडले आहेत. पठाण हा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला. त्यानंतर आता शाहरुखचा ‘जवान’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जवान जर हिट झाला तर शाहरुख आणखीनच ॲटिट्यूड दाखवणार, अशी टीका नेटकऱ्यांनी केली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या गांधीनगर जवळील विजय ममता चित्रपटगृहाजवळ ट्रॅक्टरची वाहतूक करणाऱ्या ट्रकची एका तरुणाला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक युवक...