मुंबई | Mumbai
अभिनेता सोनू सूद गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या आठवड्यात अनधिकृत बांधकाम प्रकरणी सोनू सूद विरोधात मुंबई महापालिकेने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दरम्यान सोनू सूद यानं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेतली.
दरम्यान, गेल्या आठवड्यात अनधिकृत बांधकाम प्रकरणी सोनू सूद विरोधात मुंबई महापालिकेने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सोनू सूद याच्या जुहू येथील सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले होते. त्यामुळे महापालिकेने याप्रकरणी सोनू सूदविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणानंतर सोनू सूदने मुंबई उच्च न्यायालयात महापालिकेच्या नोटिशीला आव्हान दिले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने महापालिकेला 13 जानेवारीपर्यंत सोनू सूद विरोधात कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले होते. आज सोनू सूदच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर सोनू सूद यानं आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीबद्दल तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. यापूर्वी सोनू सूदने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची भेट घेतली होती. या भेटीबद्दल तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.