Sunday, May 26, 2024
Homeनाशिकधाकड गर्ल कंगना त्र्यंबकराज चरणी लीन ; परिवारासह घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

धाकड गर्ल कंगना त्र्यंबकराज चरणी लीन ; परिवारासह घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

नाशिक | Nashik

बॉलिवूडची ‘पंगाक्वीन’ कंगना रनौत सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारी कंगना धार्मिक आहे. अनेकदा ती वेगवेगवळ्या मंदिरांना भेट देत असते. कंगना जितकी बोल्ड आहे. तितकिच ती धार्मिक असल्याचंही सर्वांनाच माहित आहे. ती नेहमी देवभक्तीत लीन असते.

- Advertisement -

कंगना राणावत (Kangana Ranaut) हिने गुरुवारी दुपारी आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर (Trambakeshwar Jyotirling) येथे दर्शनासाठी भेट देऊन त्र्यंबकेश्वराचे दर्शन व अभिषेक पुजा केली. मात्र आता कंगना राणावत यांनी त्र्यंबकेश्वराच्या दर्शनामुळे मन प्रसन्न झाले व आध्यात्मिक आनंद मिळाला असल्याचे सांगितले.

पायरेटेड सिनेमा अन् वेबसिरीज बघाल तर..; नव्या कायद्यानूसार होऊ शकते ‘इतक्या’ वर्षांची शिक्षा

कंगनाने त्र्यंबकेश्वर येथील फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. कंगना यावेळी सलवार सूटमध्ये दिसत आहे. तसेच तिचे कुटुंबीय देशील या फोटोंमध्ये दिसत आहेत.कंगना रणौतने काही फोटोदेखील पोस्ट केले आहेत. त्यात तिने लिहिले आहे की, “आज त्र्यंबकेश्वरला भेट दिली.” यानंतर तिचे हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

कंगनाच्या वर्कप्रंटबद्दल बोलायचे तर, कंगनाचा निर्मिती अससेला ‘टिकू वेड्स शेरु’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर कंगनाच्या ‘तेजस’ चित्रपटाचा लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.कंगनाचा तमिळ हॉरर कॉमेडी असलेला ‘चंद्रमुखी २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित ‘इमरजन्सी’ या चित्रपटात कंगना मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या