Tuesday, November 26, 2024
HomeमनोरंजनBollywood Drugs Case : अक्षय कुमारने शेअर केला व्हिडिओ,म्हणाला...

Bollywood Drugs Case : अक्षय कुमारने शेअर केला व्हिडिओ,म्हणाला…

मुंबई । Mumbai

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन (Bollywood Drugs Case) प्रकरण समोर आले. या प्रकरणात अनेक मोठ्या कलाकारांची नावे घेण्यात आली . या सर्व प्रकरणावर बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. अक्षय कुमारने या व्हिडीओ द्वारे विनंती केली आहे .

- Advertisement -

अक्षय कुमारने शेअर केलेल्या व्हिडिओ मध्ये म्हंटले आहे की, “आम्ही केवळ एक इंडस्ट्री नाही तर आम्ही चित्रपटांमधून देशातील संस्कृती जगभरात पोहोचवत आहोत. तुम्हाला जे जे वाटतं ते ते आम्ही आमच्या चित्रपटातून मांडतो मग ते बेरोजगारी असे, भ्रष्टाचार असो वा गरीबी. अशा मध्ये जर आज तुमच्या भावना दुखावल्या असतील आणि तुम्ही रागावला असाल तर तुमचा तो रागही आम्ही झेलू. सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अनेक प्रकरणे समोर आली. ते ऐकून आम्हालाही तितकचे दु:ख झालं जितके तुम्हाला. यावरून आम्हाला आमचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. त्यामुळे मी माझ्या हृदयावर हात ठेवून कसं खोट बोलू की बॉलिवूडमध्ये ड्रग्ज ही समस्या आहे. मात्र या इंडस्ट्रीतले सर्वच सामील आहेत असं होऊ शकत नाही. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. जे या प्रकरणाचा योग्य तो तपास करेल. आणि मला विश्वास आहे इंडस्ट्रीतील प्रत्येक जण यात सहकार्य करेल. मात्र या सर्वासाठी पूर्ण इंडस्ट्रीला बदनाम करणे चुकीचे आहे. माझा मिडियावर प्रचंड विश्वास आहे. जे योग्यवेळी योग्य मुद्दे उचलल्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले. त्यामुळे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले हे काम सुरुच ठेवावे. मात्र थोडे सांभाळून आणि विचार करुन. कारण एखादी नकारात्मक बातमी एखाद्याच्या आयुष्यभरच्या मेहनतीवर पाणी फिरवू शकते. त्यांना बरबाद करु शकतो. शेवटी एवढेच सांगतो तुम्हाला आमच्यावर राग असेल तर तो आम्ही आणखी मेहनत करुन दूर करू. तुमचा विश्वास पुन्हा जिंकू. तुम्ही आहात तर आम्ही आहोत. त्यामुळे तुमची ही साथ कायम राहू दे.” असेही अक्षय कुमारने या व्हिडिओत म्हटले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या