Wednesday, February 4, 2026
Homeमुख्य बातम्याRashmika Mandanna : अभिनेत्री रश्मिकाचा १३ वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीशी झाला होता...

Rashmika Mandanna : अभिनेत्री रश्मिकाचा १३ वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीशी झाला होता साखरपुडा; पण… ; नेमकं काय घडलं होतं?

मुंबई | Mumbai

अभिनेत्री रश्मिका मंदाना (Actress Rashmika Mandanna) ही तिच्या आयुष्यात नेहमीच चर्चेत असते. त्यामुळे चाहतेही तिच्या नात्याबाबत जाणून घेण्यास उत्सुक असतात. अशातच आता अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचे कन्नड अभिनेता रक्षित शेट्टीसोबत साखरपुडा (Engagement) झाल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. मात्र, हे फोटे जुने असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

रश्मिका आणि रक्षित शेट्टीची (Rakshit Shetty) भेट २०१६ मध्ये आलेल्या एका कन्नड चित्रपटाच्या सेटवर झाली होती. तेव्हा रक्षित हा आधीपासूनच नावाजलेला अभिनेता होता. यानंतर याच सेटवर दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली आणि वर्षभरात म्हणजेच जुलै २०१७ मध्ये त्यांनी साखरपुडा केला. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो तेव्हाचाच आहे. ज्यामध्ये हे दोघं सेम ड्रेसिंग स्टाईलमध्ये केक कापताना आणि अंगठी घालताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत कुटुंबिय आणि मित्रही उपस्थित आहेत.

YouTube video player

मात्र,या साखरपुड्याच्या वेळी रश्मिका फक्त २१ वर्षांची होती तर रक्षित ३४ वर्षांचा होता. पण त्यानंतरच्या एका वर्षातच त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि सप्टेंबर २०१८ मध्ये त्यांनी साखरपुडा मोडून टाकला. त्यांनी कधीच एकमेकांवर दोष ठेवला नाही किंवा का ब्रेकअप झाले याबद्दल बोललेही नाही. रश्मिका मंदाना आज टॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत आपला ठसा उमटवत असली तरी फार थोड्या लोकांना माहिती आहे की तिने खूप लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. जर हे लग्न झालं असतं, तर कदाचित रश्मिका आज इतकी मोठी स्टार बनली नसती.

रश्मिका सातत्याने सिनेक्षेत्रात काम करत असून, तिचे नाव विजय देवरकोंडासोबत जोडले जात आहे. मात्र रश्मिका आणि विजयने याबद्दल कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. रश्मिका मंदाना सातत्याने चित्रपट (Movie) करत असून, अलीकडेच ती पुष्पा २ आणि सलमान खानसोबत सिकंदर या चित्रपटात दिसली होती. दोन्ही चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. चाहते तिच्या एका झलकसाठी उत्सुक असतात आणि तिच्या गोंडस एक्सप्रेशन्सवर फिदा असतात. त्यामुळे सोशल मीडियावर लाखो लोक तिला फॉलो करतात.

ताज्या बातम्या

Malegaon MC Politics : महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेना-एमआयएमची उडी; नाट्यमयरित्या अर्ज...

0
मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी (Mayor and Deputy Mayor Election) काल (मंगळवारी) अंतिम मुदतीत शिवसेनेने महापौर व उपमहापौरपदासाठी तर एमआयएम पक्षाने उपमहापौर...