मुंबई | Mumbai
अभिनेत्री कंगना रणौत आणि अभिनेता दिलजीत दोसांज या दोघांमध्ये दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन ट्विटर वॉर सुरु झालं आहे. एकीकडे कंगना शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विरोध करत आहे.
तर दुसरीकडे दिलजीत शेतकऱ्यांना पाठिंबा देत कंगनावर निशाणा साधत आहे. या वादात आता बॉलिवूड आणि पंजाबी सिंगर मिका सिंग यानेही कंगनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.
मिकाने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन दोन वृद्ध आज्जींचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोवर कंगनाने डिलीट केलेल्या ट्विटचा स्रीनशॉटही आहे. या ट्विटसोबत मिकाने, “माझ्या मनात कंगनासाठी खूप आदर होता. तिच्या ऑफिसची तोडफोड झाली तेव्हा तिच्या समर्थनार्थ मी ट्विटही केलं होतं. पण मला आता वाटतंय की मी चुकीचा होतो. स्वतः एक महिला असल्याने तू वृद्ध महिलेचा थोडातरी आदर ठेवायला हवा. तुला लाज वाटायला हवी..तुझ्यात थोडेजरी शिष्टाचार असतील तर माफी माग”, अशी संतप्त प्रतिक्रिया मिकाने दिली आहे.
कंगनाने शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या वयोवृद्ध महिलेबाबत ट्विट केलं होतं की, ‘ही १०० रूपयात अव्हेलेबल आहे. शाहीन बागमध्येही हीच महिला होती आणि आता शेतकरी आंदोलनातही तिच आहे’.कंगनाच्या या ट्विट मुळे सर्वत्र आक्रोश पाहायला मिळत होता या ट्विट मुळे कंगना बरीच ट्रोल झाली नंतर कंगना कडून हे ट्विट डिलीट करण्यात आले होते.
याच मुद्द्यावरून अभिनेता व गायक दिलजीत दोसांजने कंगनाला सुनावले दलजितने ट्विट केले होते कि, ‘कंगना, पुराव्यासोबत हे ऐक. बंदा इतना भी अंधा नहीं होना चाहिए,’अशा शब्दांत त्याने एक व्हिडीओ शेअर करत दिलजीतने कंगनाला फटकारले. यांनतर कंगना आणि दलजित मध्ये ट्विट युद्ध चांगलेच पेटले होत. दोघांमध्ये चांगलाच शाब्दिक वाद पाहायला मिळाला.