Friday, September 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशकातील गोविंदनगरमध्ये बॉम्बची अफवा

नाशकातील गोविंदनगरमध्ये बॉम्बची अफवा

बॉम्ब शोध पथकाकडून तपासणी; बॉम्ब नसल्याचे निष्पन्न

नवीन नाशिक | प्रतिनिधी

- Advertisement -

गोविंद नगर परिसरातील जॉगिंग ट्रॅक लगत मुख्य रस्त्यावर कोणी अज्ञात इसमाने एका थर्मोकॉलच्या बॉक्स मध्ये काही वस्तू ठेवून इथून निघून गेल्याची माहिती अंबड पोलिसांना कळताच या बॉक्स मध्ये काही स्फोटक असल्याचा संशय आल्याने त्यांनी तात्काळ खबरदारी घेत बॉम्ब शोध पथकास पाचारण करण्यात आले.मात्र तपासाअंती यात काहीही भेटून न आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार (दि. १५ नोव्हेंबर) रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास अंबड पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गोविंद नगरच्या मुख्य रस्त्यावर कोणी अज्ञात इसमाने एका थर्मकोल च्या बॉक्स मध्ये काही इलेक्ट्रिकल वस्तू टाकून दिल्या असून यात बॉम्ब असू शकतो असे सांगितल्यानंतर अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगविंद्रसिंग राजपूत हे आपल्या टीमसोबत अवघ्या काही मिनिटात पोहचले.

मुख्य रस्त्यावरील मोठ्या प्रमाणावरील वाहतूकीचा अंदाज घेऊन व रहिवासीयांच्या सुरक्षतेची जबाबदारी आपल्यावरच असून लागलीच भुजबळ फार्म येथील बोगद्याकडून रस्ता बंद करून एकेरी वाहतूक सुरु केली. घटना स्थळी एकही सर्वसामान्य माणसांना जाण्यास मज्जाव करण्यात आला.

यावेळी तात्काळ बॉम्ब शोध पथकास पाचारन करत बॉक्स ची तपासणी केली असता या बॉक्स मध्ये लग्न सराईत अथवा वाढदिवसास फोडण्यात येणारे रंगीबेरंगी फटाके असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

ताज्या बातम्या

संभाजी

एमपीएससीविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिव महेंद्र हरपाळकरांच्या तोंडाला फासले काळे

0
मुंबई | Mumbaiमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गैरकारभारावरुन राज्यातील स्पर्धा परीक्षार्थी आणि विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटी, परीक्षांमधील गैरप्रकार...