Friday, November 22, 2024
Homeदेश विदेशPlanes Bomb Threat : विमानांमध्ये बॉम्ब असल्याच्या धमक्यांमध्ये वाढ; सरकारने घेतला मोठा...

Planes Bomb Threat : विमानांमध्ये बॉम्ब असल्याच्या धमक्यांमध्ये वाढ; सरकारने घेतला मोठा निर्णय

दिल्ली | Delhi

गेल्या काही दिवसांत विमानांमध्ये बॉम्ब असल्याच्या धमक्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. या अशा प्रकारच्या धमक्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे तसेच अनेक विमान कंपन्यांची वेळापत्रकं कोलमडली आहे.

- Advertisement -

याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार कडून मोठी पावलं उचलण्यात आली आहेत. सरकार कडून देशभरातील विमानतळांवरून उडणाऱ्या उड्डाणांवर एअर मार्शलची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान काल एअर इंडिया एक्स्प्रेसच्या एका विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशातील महर्षि वाल्मिकी विमानतळावर या विमानाचे आप्तकालीन लँन्डिंग करण्यात आले, तर दुसरीकडे दिल्लीवरून शिकागोला जाणाऱ्या एका एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर दिल्लीवरून शिकागोला जाणाऱ्या विमानाचे कॅनडामध्ये आप्तकालीन लँन्डिंग करण्यात आले.

दरम्यान, मंगळवारी एअर इंडियाच्या विमानासह सात वेगवेगळ्या विमानांमध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती. त्यामध्ये जयपूर ते बेंगळुरूमार्गे अयोध्या (IX765) एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट, दरभंगा ते मुंबई (SG११६) स्पाईसजेट फ्लाइट, बागडोगरा ते बेंगळुरू (QP१३७३) आकाशा एअर फ्लाइट, दिल्ली ते शिकागो (AI १२७) एअर इंडियाचे फ्लाइट, दम्मम (सौदी अरेबिया) ते लखनौ (6E ९८) इंडिगो फ्लाइट, अलायन्स एअर अमृतसर-डेहराडून-दिल्ली फ्लाइट (९I ६५०) आणि एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट (IX ६८४) मदुराई ते सिंगापूर. या विमानाचा समावेश होता.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या